ZP Varsha Fadol esakal
नाशिक

Nashik ZP News: पहिल्याच दिवशी वर्षा फडोळ फिल्डवर; पेठ तालुका दौरा

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी बुधवारी (ता. १९) सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्याच दिवशी त्या थेट फिल्डवर उतरल्या आहेत.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ यांनी गुरुवारी (ता. २०) पेठ तालुका दौरा करीत येथे ग्रामसेवकांची बैठक घेतली. तसेच, देवळीचा पाडा येथे भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. (Varsha Fadol on first day Tour of Peth Taluka Nashik ZP News)

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी या रिक्तपदी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ यांची नियुक्ती झाली. फडोळ यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

त्यानंतर गुरुवारी फडोळ यांनी पेठ तालुका दौरा करीत ग्रामसेवकांची बैठक घेतली. बैठकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, ग्रामपंचायतींच्या दप्तर, १५ व्या वित्त आरोग्याचा निधी खर्च, आयुष्यमान भारत कार्ड आदी योजनांचा त्यांनी आढावा घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रत्येक ग्रामपंचायतीने दप्तर व्यवस्थित ठेवावे, यात दिरंगाई होता कामा नये, अशा सूचना त्यांनी करीत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आदेश दिले. तसेच, तालुक्यातील अफरातफर झालेल्या, तक्रारी असलेल्या ग्रामसेवक याबाबत त्यांनी आढावा घेतला.

तालुक्यातील देवळाची पाडा येथे त्यांनी भेट दिली. गेल्या वर्षी येथील गावात नदीतून विद्यार्थी शाळेत जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्या अनुषगांने यंदा असा प्रकार होत आहे का, याची तपासणी त्यांनी केली. यंदा असा प्रकार होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर, नदीवर पूल मंजूर झाला असून, निधी उपलब्ध होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT