sunil bagul, gite, raut shivsena.jpg
sunil bagul, gite, raut shivsena.jpg 
नाशिक

शिवबंधन तर बांधले.. पण गिते, बागुल आणि पांडेंना 'ही' पदे मिळणार असल्याची चर्चा!

विक्रांत मते

नाशिक : वसंत गिते व सुनिल बागुल यांचा आज (ता.८) शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दोघांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले. तर ही पदे कोणती असणार याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहे.

गिते व बागुल यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

वसंत गिते व सुनिल बागुल यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दोघांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार गिते यांच्याकडे उपनेते पद दिले जाणार आहे. त्यापुर्वी महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्यातील एखादे महामंडळाचे अध्यक्षपद देखील गिते यांच्याकडे सोपविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बागुल यांच्याकडे सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यापुर्वी जिल्हा प्रमुख पदासाठी देखील त्यांचे नाव चर्चेत आहे. विनायक पांडे यांचे नाव जिल्हाप्रमुख पदासाठी असले तरी महापालिका निवडणुकीत एखादी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

पदांबाबत जोरदार चर्चा

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वसंत गिते व सुनिल बागुल यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने गिते यांच्याकडे शिवसेना उपनेते पद, बागुल यांच्याकडे सहसंपर्क तर विनायक पांडे यांची जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा शिवसेनेत आहे. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

तुर्त करंजकर जिल्हाप्रमुख 
विद्यमान जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस करण्यात आली आहे. आमदारकीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर करंजकर यांच्याएवजी जिल्हाप्रमुख पदावर पांडे किंवा बागुल यांची नियुक्ती होईल अशी माहिती समोर आली आहे. बागुल यांच्याकडे श्रमिक सेना संघटना असल्याने संघटनेची पदे देताना हि मोठी अडचण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

आजी-माजी उपमहापौर भाजपमध्येचं 
वसंत गिते यांचा मुलगा प्रथमेश गिते माजी उपमहापौर आहेत. गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी प्रथमेश तुर्त भाजपमध्येचं राहणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागुल ह्या सुनिल यांच्या मातोश्री आहेत. त्या देखील भाजप मध्येचं राहणार असल्याचे सांगण्यात आले. एकाचं घरातील कुटूंब प्रमुख शिवसेनेत व नगरसेवक भाजप मध्ये अशी स्थिती राजकीय स्थिती दोन्ही कुटूंबामध्ये राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT