Vasant vyakhyanmala completing centenary year nashik news esakal
नाशिक

Vasant Vyakhaynmala : गॅसबत्ती, 1 टेबल, 2 खुर्च्या ते थेट प्रक्षेपण; 100 वर्षांचा थक्क करणारा प्रवास

दत्ता जाधव

Nashik News : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी १९०५ साली वसंत व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवल्यावर पुढील तीन चार वर्षे सुरळीत सुरू राहिलेली माला न्या. रानडे यांच्या बदलीनंतर खंडित झाली. (Vasant vyakhyanmala completing centenary year nashik news)

त्यानंतर १९२२ मध्ये पुण्याप्रमाणे नाशिकमध्येही व्याख्यानमाला सुरू करावी, अशी कल्पना तत्कालीन समाजधुरिणांनी मांडल्यावर १९२२ मध्ये गॅसबत्ती एक टेबल, दोन खुर्च्यांवर सुरू झालेल्या मालेचा गॅसबत्ती ते थेट प्रक्षेपण हा शंभर वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे.

जगद्गुरू शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या प्रोत्साहनाने वसंत व्याख्यानमालेचे उद्‌घाटन झाले. रावसाहेब वझे हे पहिले अध्यक्ष तर पानसे वकील, द. बा. टकले यांनी चिटणीस म्हणून काम पाहिले. देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरातर्फे एक टेबल, दोन खुर्च्या व गॅसबत्ती या भांडवलावर पहिल्याच वर्षी महिनाभर व्याख्यानमाला चालली.

खुर्चीवर बसण्यासाठी एक रूपया

१९२२ मध्ये व्याख्यानमाला रीतसर सुरू झाल्यावर पुढील वर्षी पंचवीस खुर्च्या भाड्याने घेण्यात आल्या. सुरवातीला देणगीदार नसल्याने मालेचा महिन्याचा खर्च भागविणे अवघड होत असे. त्यामुळे खुर्चीवर बसण्यासाठी एक रूपया देणगी मूल्य घेण्यात आले. थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे येणाऱ्या नामांकित व्यक्तींनाच व्याख्यानासाठी आमंत्रित केले जात होते. त्यासाठी वक्त्यांना कोणतेही मानधन दिले जात नव्हते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कालांतराने पत्रव्यवहार करून त्या त्या क्षेत्रातील विद्वानांना आमंत्रित केले जाऊ लागले. सुरवातीच्या काळात जाण्यायेण्याचा खर्च वक्तेच करत असत. मिळालेल्या शंभर ते दीडशे रुपये वर्गणीतून खर्च भागविला जात असलातरी अनेक नावाजलेल्या वक्त्यांना स्वतःच्या खर्चाने येथे येणे शक्य नव्हते.

त्यामुळे चांगले वक्ते मिळणे दुरापास्त झाले. कालांतराने मालेच्या वाढत्या प्रतिसादानंतर खुर्च्या रद्द करून सतरंजी अंथरण्यास सुरवात झाली. कालांतराने खर्च भागविण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह शहरातून देणग्या मिळविण्यास सुरवात झाली.

राष्ट्रीय नेत्यांचा सहभाग

पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने व श्रोत्यांच्या वाढत्या प्रतिसादानंतर व्याख्यानमालेला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळाली. सुरवातीला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनमोहन मालवीय, आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, सरोजिनी नायडू, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी मालेला वैभव प्राप्त करून दिले. स्वातंत्र्यानंतर आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, चैतन्य महाराज देवलुरकर आदींनी या वैभवात भर घातली. गॅसबत्तीच्या उजेडात सुरू झालेला मालेचा प्रवास थक्क करणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : लोंबकळणारा मृतदेह पाहून 'ती' घरी आली, नंतर लोकांनी सांगितलं 'तुझ्याच पोरानं घेतलाय गळफास...' आईला कळताचं...; कोल्हापुरातील घटना

Sangli Election : सांगलीवाडीत उमेदवारीचा पेच; महाविकास आघाडीत ताण, ऐनवेळी बदलांची शक्यता

आग लागली की लावली? सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईमध्ये भीषण वणवा; झाडं, प्राण्यांची राख, नेटकऱ्यांचा संताप

गोविंदाचं खरंच अभिनेत्रीसोबत अफेअर होतं? पत्नी सुनिता अहुजाने केला खुलासा, म्हणाली... 'ती फक्त पैशांसाठी...'

Honor Killing Case : दलित मुलासोबत केला प्रेमविवाह, वडिलांनी सात महिन्यांच्या गर्भवती मुलीची केली निर्घृण हत्या; अंगावर काटा आणणारी घटना

SCROLL FOR NEXT