Vasudev folk artist in financial difficulties  esakal
नाशिक

वासुदेव लोककला जोपासणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ

संदीप पाटील

विराणे (जि. नाशिक) : वासुदेव हरी । वासुदेव हरी । सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी ।|वासुदेव हरी म्हणत भल्या पहाटे येणारे आणि सर्वांना झोपेतून जागवणारे वासुदेव आजच्या धकाधकीच्या व डिजिटल युगात पारंपरिक, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व पडद्याआड गेल्यासारखेच जाणवत आहे. प्रहारी, गोड आवाजात गाणारे वासुदेव लहान-थोरांपासून सर्वांनाच आवडत.

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग-गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी असावी, असा अंदाज आहे. श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम, श्री संत नामदेव आणि विशेष करून श्री संत एकनाथ यांच्या साहित्यात वासुदेवावरील अनेक रूपके आढळतात. वासुदेव समाजप्रबोधन करणारी एक संस्था आहे, अशा शब्दांत साहित्यात वासुदेवाचा गौरव केला जातो. वासुदेव आपल्या गीतातून जे तत्त्वज्ञान सांगतो, त्यामध्ये दैववाद आहे. आपण चांगले काम करीत राहावे आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या अनुभवांचीच शिदोरी जवळ जपावी, अशी वासुदेवाची जीवनदृष्टी दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर

वासुदेवाच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले होते. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळविल्या आहेत. शत्रूची मानसिकता, शूत्रीची संख्या, पुढील डाव अशी माहिती वासुदेव अगदी सहजपणे महाराजांपर्यंत पोचवत. असे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान या वासुदेवाचे आहे.
हातात बासरी, डोक्यावर टोपी, टाळ वाजवत, पायात घुंगरू, विशिष्ट प्रकारचा पोशाख असलेले वासुदेव सर्वांनाच आकर्षित करत. आपल्या मधूर वाणीने उठलेले मुलं वासुदेवाच्या मागे मागे गल्लोगल्ली आनंदाने फिरत. परंतु आज या वासुदेवांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पारंपरिक वासुदेवाचे रूप घेणारे बेरोजगार झाले आहेत. घरोघरी दान मागणारे वासुदेव अनेक वर्षांपासून काही गावांत दिसलेच नाही, असे गावोगावचे ग्रामस्थ सांगतात.


''महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. लोककला महाराष्ट्राचा आत्मा आहे. परंतु आजच्या तंत्र, डिजिटलच्या युगात व सिमेंटच्या जंगलात अनेक लोककला हरवत, लोप पावत चालल्या आहे. या लोकराकारांना शासनस्तरावरून पुनरुज्जीवित करून आजच्या पिढीला महाराष्ट्राची ओळख निर्माण करावी.'' - डॉ. वीरेंद्र निकम, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे ZP निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी, कोणत्या पक्षातून कोण जिकलं? वाचा एका क्लिकवर

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: जिल्हा पंचायत निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय

Sindhudurg ZP Election Winner List 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल; वाचा कोण जिंकले? कोण हरले? पाहा विजयी उमेदवारांची यादी

Dharashiv ZP Election Results : धाराशिवच्या मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा? पाहा जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Parbhani ZP Election: परभणी जिल्हा परिषदेत कोणी मारली बाजी? पाहा आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT