weekly Market Reference Image esakal
नाशिक

Nashik Traffic : भाजी बाजार थेट रस्त्यावर; वाहतूक कोंडीसह अपघातांना आमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : महापालिकेकडून भाजी विक्रेत्यांसाठी काही ठिकाणी खास जागा उपलब्ध करून दिली असली तरी, थेट रस्त्यावरच भाजीबाजार मांडण्याच्या अट्टहासाने वाहतूक कोंडीसह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. मखमलाबाद रोडवर भाजीबाजार व मच्छी बाजार अशाच प्रकारे भरत आहे. विक्रेत्यांकडे भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्याने येणाऱ्या वाहनांना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. (Vegetable market directly across street Inviting accident with traffic jams Nashik Latest Marathi News)

मखमलाबाद गाव ते मखमलाबाद नाका, मखमलाबाद- म्हसरूळ लिंक रोड या दोन मुख्य रस्त्यांच्या कडेला भाजीबाजार तसेच मटण- मच्छी बाजार भरत आहे. हे बाजार थेट रस्त्याच्या कडेलाच भरविले जातात. मखमलाबाद परिसरातील शांतिनगर, शिंदेनगर, मानकरनगर, गुलमोहरनगर या परिसरातील रस्त्यांचे भाग बाजाराच्या वेळी विक्रेत्यांनी व्यापले आहेत.

बाजारासाठी मोकळ्या आणि रस्त्यापासून काहीशा अंतरावर व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यानुसार काही भागात अशी व्यवस्था असतानाही विक्रेते थेट रस्त्यावरच दुकाने मांडत आहेत. हे चित्र पंचवटी परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या कडेला दिसते. रस्त्यावरून जाणारे ग्राहक थांबून आपल्या भाजीपाला खरेदी करतील, या उद्देशाने रस्त्यावरच भाजीपाला मांडून विक्री करण्यावर अनेक विक्रेत्यांचा कल असतो. त्यामुळेच असे बाजार भरू लागले आहेत.

वास्तविक ग्राहक हा सर्वच बाजार फिरून त्याला योग्य वाटेल अशाच तेथूनच भाजीपाला खरेदी करीत असतो. असे असतानाही प्रत्येक विक्रेता जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोचतील या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्रीसाठी ठेवतो. अशा प्रकारे भरणाऱ्या बाजारावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईनंतर या पथकाची पाठ फिरताच हे बाजार पुन्हा जैसे थे असे बसले जातात. त्यामुळे ही रस्त्यावरच्या बाजाराची समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT