Vegetable Market News esakal
नाशिक

Nashik News: भाजीपाला उत्पादक मेटाकुटीला; आवक प्रचंड वाढल्याने बाजारभाव गडगडले

सकाळ वृतसेवा

खामखेडा : ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिके घेतली. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमालीची वाढली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले, तरी कमी का होईना पैसे मिळत असल्याने व्यापारी खुश आणि कमी भावामुळे ग्राहक आनंदी आहेत. जनावरांच्या चाऱ्यापेक्षाही भाजीपाला स्वस्त असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.(Nashik News)

भाजीपाल्याचे दर सध्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दराचे गणित बदलले आहे. दोन आठवड्यांपूर्वी २० रुपयाला मिळणारी मेथी जुडी आता दहा रुपयांत दोन मिळत आहेत. पालकाचीही जुडीदेखील पाच रुपयांत मिळत आहे. (Vegetable producer upset Market prices tumble as inflows surged nashik news)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

ग्रामीण भागातील आठवडे बाजारांमध्ये तर दहा रुपयांमध्ये मेथीच्या चार जुड्या मिळत आहेत. जनावरांना लागणारा हिरवा चारा महागडा, तर भाजीपाला अतिशय स्वस्त झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. भाजीपाल्याचे दर कोसळत असल्याने गृहिणींचे बजेट सावरले असले, तरी शेंगदाणे, गोडेतेल, डाळी, तांदूळ, स्वयंपाकाचा गॅस आदींच्या किमती कमी होणे गरजेचे आहे.

स्वस्तात भाजीपाला मिळत असल्याचा काहीसा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. मात्र, काही व्यापारी चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री करून यातही पैसे कमावताना दिसतात. त्यामुळे भाजीपाला स्वस्त असला, तरी अशा व्यापाऱ्यांचा व्यवसाय जोरात आहे.

"यंदा पाणी मुबलक असल्याने मेथी, शेपू या भाजीपाला पिकांची लागवड केली होती. मात्र, भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे."

-कैलास बच्छाव, शेतकरी, खामखेडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! वाघोलीत आईने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून केली हत्या, १३ वर्षांची लेक हल्ल्यात जखमी; काय घडलं?

Latest Marathi News Live Update : मालाड पश्चिमेकडील मालवणीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग

Shocking News : पिस्तूल हातात घेऊन बनवत होता रील, अचानक ट्रिगर दबला अन् पत्नीला लागली गोळी... धक्कादायक घटनेने खळबळ

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, दोन जखमी, चालकाचा डोळा लागला अन् तेवढ्यात कार...

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी! विशालची बाथरुममधून 'ती' वस्तू हरवली, थेट कॅप्टनचं जेवण होणार बंद?

SCROLL FOR NEXT