The cold weather has increased in the area and it is currently fogging here every day. Picture taken by Kiran Suryavanshi on Friday morning of a sheet of mist. esakal
नाशिक

Nashik Winter Crisis : दाट धुक्यामुळे कांद्यासह भाजीपाल्यालाही फटका

येथील परिसरात गेल्या तीन दिवसापासून हवामानात अचानक बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण राहते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Crisis : येथील परिसरात गेल्या तीन दिवसापासून हवामानात अचानक बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण राहते.

पहाटे दाट धुक्याची चादर पसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. (Vegetables including onions are also affected due to thick fog nashik winter crisis news)

शुक्रवारी (ता.५) मध्यरात्रीपासून ते सकाळी साडेनऊपर्यंत सर्वत्र दाट धुक्याचे आच्छादन होते. त्यामुळे कांदा उत्पादक धास्तावले आहेत. परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झालेली आहे. आधीच फवारणी व भारनियमनाच्या अनियमित वेळापत्रकातून कसेबसे सावरलेल्या पिकांवर आता या दाट धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पुन्हा महागड्या फवारण्या करण्याचे अतिरिक्त संकट निर्माण झाले आहे. खतांचा डोस द्यावा, तणनाशक मारावे की फवारण्या कराव्यात अशी द्विधा अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. करपा, भुरी व मावा सारख्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा सतत फवारण्या घ्याव्या लागतील. गहू, हरभरा व द्राक्षावर सुद्धा धुक्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे.

यावर्षी आंब्यालाही चांगला बहार आला आहे. मात्र दव व दाट धुक्यामुळे त्यावरही चिकटा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वाल, मेथी व कोथिंबीर आदी भाजीपाल्यावर देखील ढगाळ वातावरण व दाट धुक्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्वच पिकांना फटका बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT