Vehicle transporting gas overturned near Brahmanpada village no loss of life Nashik Accident esakal
नाशिक

Nashik Accident News: ब्राह्मणपाडे गावानजीक गॅस वाहतूक करणारे वाहन उलटले; सुदैवाने जिवितहानी टळली

गॅस सिलिंडर वाहन उलटल्याची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांच्या मनात धडकी भरली होती.

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : ताहाराबाद नामपूर रस्त्यावरील ब्राह्मणपाडे गावानजीक असलेल्या उतार वळण रस्त्यावर गॅस सिलिंडर वाहतूक करणारे वाहन उलटल्याची घटना गुरूवार (ता.२५) दुपारी एकच्या सुमारास घडली सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.

मात्र सदर वाहनाचे नुकसान झाले आहे. (Vehicle transporting gas overturned near Brahmanpada village no loss of life Nashik Accident News)

ताहाराबाद नामपूर हा नेहमीचाच वाहनांसाठी वर्दळीचा रस्ता असून दुपारी एकच्या सुमारास ताहाराबादकडे रावळगाव मोतीवाले गॅस एजन्सीचे सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने ब्राह्मणपाडे गावानजीक असलेल्या वळण रस्त्यावरील उतारावर अचानक उलटला.

सुदैवाने रस्त्यावर वाहतूक कमी प्रमाणात असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गॅस सिलिंडर वाहन उलटल्याची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांच्या मनात धडकी भरली होती. अपघातानंतर कुणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनाचे मात्र नुकसान झाल्याचे दिसून आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

National Health Emergency Plea: दिल्लीसह देशभरात प्रदूषणाचा कहर; 'आरोग्य आणीबाणी'चे आदेश द्या! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मनोरंजन विश्वावर शोककळा ! ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित कालवश

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

Multibagger Stock : फक्त 7 महिन्यांत दुप्पट पैसे! Nifty500 मधील हे 5 शेअर्स ठरले गुंतवणूकदारांसाठी सोने!

SCROLL FOR NEXT