nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : सिव्हिलच्या कर्मचाऱ्याकडून वाहनाची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटजवळ पार्क केलेल्या वाहनांची कंत्राटी कर्मचाऱ्याने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला जात असून संबंधित कर्मचाऱ्याने यापूर्वीही असे प्रकार केलेले आहेत.

मात्र जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्याची मुजोरी वाढत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, सदरचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Vehicle vandalized by civil hospital servant Nashik Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सतीश आहिरे (रा. मेरी, पंचवटी) असे संशयित कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव असून आहे. आहिरे यास कोरोनाकाळात बालकांच्या अतिदक्षता विभागात स्वच्छता कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात आले होते.

मात्र कोरोनानंतर त्याची तात्पुरती नेमणूक जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या ऑक्सिजन प्लांट येथे करण्यात आलेली आहे. आहिरे याने बुधवारी (ता. ३) सकाळी नऊच्या सुमारास मद्याच्या नशेत रुग्णालयातील कार्यरत अधिपरिचारिका आशा वाघ यांनी पार्क केलेल्या अॅक्टिव्हा मोपेडचे स्पीडमीटर दगडाने फोडले.

तसेच, दोन्ही चाकांची हवा काढून नुकसान केले. सतीश करीत असलेला सदरचा प्रकार ऑक्सिजन प्लांटबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानुसार वाघ यांनी स्वच्छता निरीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.

मात्र अद्यापही संशयित आहिरेवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन आहिरेवर काय कारवाई करते, याकडेच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT