Vehicles destroyed by gangsters in cidco nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : सिडकोत गावागुंडांनी केली वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौका जवळ हेगडेवार नगर येथे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काही गावागुंडानी १६ चारचाकी वाहनांसह एका रिक्षाची तोडफोड केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समजते. (Vehicles destroyed by gangsters in cidco nashik crime news)

मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील हेडगेवार नगर येथे गावागुंडानी दहशत माजविण्याच्या उद्देशाने येथील पार्किंग केलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी येथील १६ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या असून एका रिक्षाची ही मोडतोड करण्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून अंबड पोलिसांची भूमिका नेमकी काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर काही तासांपूर्वीच सिडकोतील एका व्यावसायिकावर देखील प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पार्किंग केलेल्या गाड्यांची तोडफोड

सिडकोतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता यांच्यावर नाशिक शहर पोलीस आयुक्त "अंकुश" लावण्यास अजून किती दिवस लावतील, की सिडको वासियांनी अशाच भीतीच्या सावटामध्ये आमचे आयुष्य काढायचे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला.

गाड्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता हे नुकसान भरायचे तरी कसे अशी आर्त हाक आता रहिवासीयांमधून देण्यात आली आहे.तर या प्रकारबाबत निषेध म्हणून त्रिमूर्ती चौक येथे रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे रहिवासीयांमधून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

West Bengal Politics: ‘तृणमूल’कडून झालेला छळ विसरलो नाही; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, राजकीय गुन्ह्यांची चौकशी होणार!

'मुलांना जन्माला घालण्यापेक्षा कुत्रा पाळा' शेफाली शाहचा सल्ला, तरुण पिढीला दिला 'हा' सल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

SCROLL FOR NEXT