School  esakal
नाशिक

Nipun Utsav Karyakram : शाळांमधील निपुण उत्सव कार्यक्रमांची पडताळणी

सकाळ वृत्तसेवा

Nipun Utsav Karyakram : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यात निपुण उत्सव कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. (Verification of nipun utsav karyakram in school nashik news)

राज्यात निपुण उत्सव कार्यक्रम राबविण्यासाठी नाशिक जिल्ह्याची निवड झालेली आहे. निवड झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत निपुण उत्सव कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला गेला.

राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमांची आता पडताळणी केली जाणार आहे. यात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दोन आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने किमान तीन शाळांना भेटी देऊन निपुण उत्सव कार्यक्रम संदर्भात बाब निहाय पडताळणी करतील.

साधारण जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी, डायचे अधिकारी, प्राथमिक, माध्यामिक शिक्षणतील अधिकारी, शिक्षण योजना विभागातील अधिकारी ही पडताळणी करतील. पडताळणी झाल्यानंतर त्यांचा सविस्तर अहवाल हा शिक्षण विभागास सादर करतील, असे डॉ. बच्छाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT