Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : प्रवाशांना मारहाण करून व्हर्ना कार पळवली

अजित देसाई

Nashik News : नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास स्कोडा कार मधून आलेल्या संशयीतांनी पुढे चालणारी हुंडाई व्हर्ना कार थांबवून तिघा प्रवाशांना मारहाण करत ही कार पळून नेल्याचा प्रकार घडला. (verna car stolen by thieves nashik crime news)

नाशिकच्या चेहेडी भागातील दोघे गॅरेज व्यावसायिक एमएच 04 / जी 6692 या क्रमांकाच्या हुंडाई व्हर्ना कार मधून दौंड येथून नाशिककडे परत येत होते. नांदूर शिंगोटे शिवारातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी इंधन भरल्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास नाशिककडे प्रयाण केले. यादरम्यान पाठीमागून भरधाव आलेली स्कोडा कार आडवी लावून संशयीतांनी त्यांना थांबण्यास भाग पाडले.

स्कोडा कारमध्ये चौघेजण होते. या कारमधून उतरलेल्या संशयितांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी व्हर्ना कारमधील तिघेजण अंधारात पळाले. मात्र कारची चावी तशीच असल्याने स्कोडा कार मधील संशयकांनी ही कार घेऊन नाशिकच्या दिशेने पोबारा केला. आपली कार घेऊन संशयित पसार झाल्याची माहिती चेहडी येथील या युवकांनी नांदूर शिंगोटे पोलीस दुरक्षेत्रात दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कार पळवल्याची माहिती समजल्यावर वावीचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा नांदूरशिंगोटे येथे दाखल झाला. दोन्ही कारच्या शोधासाठी जिल्हाभर नाकाबंदी लावण्यात आली. तसेच सिन्नर व एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकांच्या मदतीने संपूर्ण जिल्हाभर पहाटेपर्यंत शोध मोहीम सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT