Vibhav Shinde esakal
नाशिक

Nashik News : नाशिकचा विभव ठरला पोडियम पूर्ण करणारा पहिला सायकलिस्ट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकचे सायकलिस्ट विभव शिंदे या तरुणाने ६८ वर्षीय मोहिंदरसिंग भरज आणि इतर भारतीय सायकलिस्टबरोबर इन्स्पायर इंडियातर्फे घेण्यात आलेल्या पुणे ते गोवा (डेक्कन क्लिफहेंगर स्पर्धेत स्वआधारित (सोलोराइड) गटात देशात दुसरा क्रमांक पटकाविला. येथील विभव शिंदे हा इन्सायर इंडियाच्या तिन्ही इव्हेंटमध्ये पोडियम पूर्ण करणारा पहिलाच भारतीय सायकलिस्ट ठरला. (Vibhav became first cyclist to complete podium Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

विभव हा गंगापूर रोड येथील रहिवासी आहे. सध्या बंगलोर येथील इंटरनेट कन्सल्टंट, सिस्को येथे कार्यरत आहेत. विभवने या स्पर्धेत स्वआधारित गटात अल्ट्रा स्पाइस-१२०० किलोमीटर (द्वितीय), हिमालयन अल्ट्रा-४४४ किमी (प्रथम), डेक्कन क्लिफहेंगर-६६४ किमी (द्वितीय) अशा इव्हेंटमध्ये सलग तीन वेळा पोडियम फिनिश करून रेकॉर्ड केल्यामुळे तो पहिला भारतीय सायकलिस्ट ठरला.

डेक्कन क्लिफहेंगर स्पर्धा ही जागतिक अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनची होणारी महत्त्वाची स्पर्धा असते. ही स्पर्धा पुणे ते गोवा अशी ६४३ किमीची होती. हा रस्ता अत्यंत खडतर आणि जिकिरीचा असा होता. ६००० मीटर एकूण चढाई या जिद्दी सायकलपटूची कस पाहणारी होती. यापूर्वी २०१७ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षीसुद्धा मोहिंदरसिंग भरज यांनी ही शर्यत पूर्ण केली होती.

"सायकल हे एक वेड आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नीट राहाते. हे दोघेही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य असून, या फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने, प्रसिद्ध सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन, वडील प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांचे त्याला सहकार्य लाभले."

- विभव शिंदे (सायकलिस्ट नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT