Vijay karanjakar 
नाशिक

विधान परिषदेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर चर्चेत

विक्रांत मते

नाशिक : राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आज सादर करण्यात आलेल्या यादीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे.

करंजकर हे बालपणासुन शिवसैनिक आहेत. भगूर, देवळली कॅम्प परिसरात त्यांनी सुरुवातीला शिवसेना रुजवली, भगूर नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी कार्याचा ठसा उमटविला. पुढे शहर प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख या संघटनेच्या पदांवर काम करताना त्यांनी शिवसेनेची पाळेमुळे रुजविली. बाळासाहेब ठाकरे यांचे खांदे समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते. 

त्या संयमाचे फळ मिळाले

लोकसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या करंजकर यांना पक्षाकडून थांबण्याचे आदेश देण्यात आले होते, त्या संयमाचे फळ म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती निश्चित मानली जात आहे. लोकसभा निवडणुकी वेळी त्यांना भविष्यात तुमचा विचार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. विधान परिषदेच्या निमिताने वरिष्ठांनी दिलेले आश्वासन पूर्ण होताना दिसत आहे. करंजकर यांच्या बरोबरच उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे- पाटील, चंद्रकांत रघुवंशी यांची नावे राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या यादीत आहेत. 

खडसेंमुळे शेटे वगळले

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व कादवा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष श्रीराम शेटे यांना राष्ट्रवादी कोट्यातून संधी मिळणार हाती परंतु भाजपातून नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांना संधी देण्यात आल्याने शेटे यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT