tribal community esakal
नाशिक

Nashik News: आदिवासी लोकसंख्या गावासाठी ग्रामस्तरीय अभिसरणाची समिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्र सरकारने अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या गावासाठी आदर्श गाव संकल्पनेवर आधारित एकात्मिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी पंतप्रधान आदि आदर्श ग्राम योजना सुरु केली.

त्यासाठी राज्यात ग्रामस्तरीय अभिसरण समिती स्थापन करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला. (Village Level Convergence Committee for Tribal Population Village Nashik News)

सरपंच या समितीचे अध्यक्ष असतील. ग्रामपंचायतीमधील सर्व आदिवासी सदस्य, अंगणवाडी सेविका-सेवक, आशा सेविका, ए. एन. एम., पंचायत राज आणि सार्वजनिक बांधकामाची यंत्रणा, नरेगा योजनेत काम करणारे, शिक्षक, संबंधित विभागाचे प्रतिनिधी, ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक, आवश्‍यकतेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक सहाय्य संसाधन संस्थेचे प्रतिनिधी विशेष आमंत्रित यांचा समितीत समावेश असेल. एक आदिवासी सदस्य हे सचिव असतील.

समितीची तीन महिने अथवा आवश्‍यकतेनुसार बैठक होईल. गरजांचे सर्वेक्षण, माहितीचे संकलन, ग्रामविकास आराखडा तयार करणे, अंमलबजावणी करणे, मूल्यमापन आणि संनियंत्रण ही कामे समितीची असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Fastest Century: वैभव सूर्यवंशीने वन डे क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलला; ठोकले सर्वात वेगवान शतक, वर्ल्ड रेकॉर्ड अन् २८ चेंडूंत त्सुनामी

Vaibhav Sooryavanshi 16 ball fifty against UAE: ६,६,६,६,६,६,६,६! वैभव सूर्यवंशीने 'पाकड्यांचा' राग यूएईवर काढला, कोणालाच न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदें आक्रमक; ३ डिसेंबरला पुण्यात काढणार मोठा मोर्चा, 'अदानी ग्रीन एनर्जी'ला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी

शाळांच्या प्रवेश प्रक्रियेला नियमांचा लगाम! पालकांच्या मुलाखती, विद्यार्थ्यांच्या चाचण्या आणि देणगी घेण्यास बंदी

पेपरफुटीप्रकरणी १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस; मालमत्ताही होणार जप्त

SCROLL FOR NEXT