Maratha reservation issue carried out by citizens of Mashal Morcha. esakal
नाशिक

Maratha Reservation: पश्चिम पट्ट्यात गावोगावी आरक्षण आंदोलन तीव्र! गिरणारे, मातोरी गावात मशाल मोर्चे

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गावोगावी नेत्यांना बंदी केली असताना आता तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावोगावी सकल मराठा समाजातर्फे मोर्चे काढून प्रबोधन रॅल्यांतून मराठा आरक्षणाची शपथ दिली जात आहे. (Village to village reservation movement in western belt intensified Falling torch marches in Matori village nashik)

गिरणारे, मातोरी गाव आणि परिसरात बुधवारी (ता. १) महिला, मुले, युवक व शेतकऱ्यांनी गावात एकत्र येत मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी, तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ गावोगाव मशाल मोर्चे काढले.

‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणा देत डोक्यात भगव्या टोप्या, हातात फलक व मशाली, मेणबत्त्या घेऊन गिरणारे, मातोरी व परिसरातील नागरिकांनी एकत्रितपणे मशाल रॅलीत सहभाग घेतला.

गिरणारे, मातोरी, वाडगाव, नागलवाडी, दुगाव, नाईकवाडी, धागूर, मुंगसरे, यशवंतनगर या पश्चिम पट्ट्यातील हजारो नागरिक मशाल मोर्चात सहभागी होते.

गाव, खेड्यांवर प्रबोधन

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनविषयक सूचना घरोघरी पोहोचविण्यासाठी, तसेच नाशिकला सुरू असलेल्या साखळी उपोषणाला बळ मिळण्यासाठी गावोगावी सकल मराठा समाजाचे ठराव नेण्याकरिता प्रबोधन सुरू आहे.

प्रचारक राम खुर्दळ, शिवव्याख्याते नितीन डांगे-पाटील, ॲड. कैलास खांडबहाले आदींनी मराठा समाजाचे निर्णय सांगून मराठा आरक्षणाची शपथ दिली.

मराठवाड्याच्या अंतरवाली सराटी येथून जरांगे-पाटील हा युवक घरादारावर तुळशीपत्र ठेवून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे. हा लढा आता गाव-खेड्यापर्यंत पोहोचविला जात आहे.

आंदोलकांना आवाहन

- येणारी दिवाळी मराठा समाजाने साजरी करू नये

- मराठा तरुण, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये

- कुठेही उद्रेक होईल असे आंदोलन करू नये

- गावोगावी मराठा आरक्षणाबद्दल दिली जाते शपथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT