Summer esakal
नाशिक

आयडीयाची कल्पना! स्प्रिंक्लरचा वापर करून घेताय गारव्याचा आनंद 

युवा शेतकऱ्याने क्लृप्ती लढवत शेतीपयोगी टाकाऊ साहित्याचा छतावर वापर करून 'गर्मी मे भी ठंडा ठंडा कुल कुल'चा मनसोक्त आनंद घेत आहेत.

दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : उकाड्यामुळे सर्वच जण असह्य झाले आहे. उकाड्यात बचावासाठी अनेक जण कुलर, एसी, फॅनचा वापर करतात तरीही तीव्र उन्हाच्या लाटेपासून बचाव होत नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान युवा शेतकऱ्याने क्लृप्ती लढवली आहे. शेतीपयोगी टाकाऊ साहित्याचा छतावर वापर करून 'गर्मी मे भी ठंडा ठंडा कुल कुल'चा मनसोक्त आनंद घेत आहेत.

अशी आहे आयडीया...

युवा प्रयोगशील शेतकरी बाजीराव शंकर भामरे यांनी सद्याचे अतिशय उष्ण वातावरणात पाहता क्लृप्ती लढविली आणि ती यशस्वी केली. शेतातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून आता स्प्रिंक्लरचा वापर केला जात आहे. याच स्प्रिंक्लर नळीचा वापर त्यांनी छतावरील पत्र्यावर करून पाहीला आहे. अडगळीत पडलेल्या स्प्रिंक्लर नळ्या घेऊन घरातील पाण्याच्या नळाला जोडणी केली आहे. पाणी नळीव्दारे थेट पत्र्यावर बसवलेले स्प्रिंक्लरच्या माध्यमातून पत्र्यावर पाणी पडताच थंडावला जातो यामुळेच छताखाली थंड खेळती हवा मिळत असल्याचे श्री. भामरे सांगतात. घराच्या चारही बाजूला त्यांनी विविध प्रकारचे वृक्षारोपण केले आहे. तसेच कंपाऊंड बाहेरही वृक्षप्रेंमींकडून लागवड केलेल्या झाडांना ठिबक सिंचनावर पाणी दिलेले असल्याने हिरवाईने नटलेली दिसून येते. उकाड्यामुळे बाहेर पडणेही मुश्किल वाटत असलेल्या काही जेष्ठ नागरिक थंडावा मिळण्यासाठी बाजीराव भामरे यांच्याकडे गप्पागोष्टी करण्यासाठी तासनतास बसत असतात. छतावरील स्प्रिंक्लरमुळे 'गर्मी मे भी ठंडा ठंडा कुल कुल'चा अनेकजण मनसोक्त आनंद घेण्यास येत आहेत.

''कांदा लागवडसाठी स्प्रिंक्लर नळीचा वापर करून पत्र्यावर लावले आहेत. यामुळेच थंडावा निर्माण होत असल्याने काही मित्र मंडळीही सायंकाळी गप्पागोष्टी करण्यासाठी येतात. अजुबाजूला वृक्षारोपण केले असल्याने त्यांनाही पाणी सोय झाली आहे.'' - बाजीराव भामरे, प्रयोगशील शेतकरी अंबासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT