Sahyadri Vineyard Ultra Run esakal
नाशिक

Sahyadri Vineyard Ultra Run : ‘सह्याद्री’च्या शिवारात विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉन; मोहाडीत 14 फेब्रुवारीला प्रारंभ

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे १४ फेब्रुवारीपासून विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sahyadri Vineyard Ultra Run : सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे १४ फेब्रुवारीपासून विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. सर्व गटांसाठी असलेली मॅरेथॉन १८ फेब्रुवारी रोजी सह्याद्री फार्म्स, मोहाडी येथे होणार आहे.

शेत शिवारातून होणारी देशातील सर्वात दीर्घ अंतराची ही एकमेव मॅरेथॉन आहे. (Vineyard Ultra Marathon on area of Sahyadri on 14 february 2024 nashik news)

गेल्या वर्षाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा दुसऱ्या वर्षी या मॅरेथॉनचे भव्य आयोजन केले आहे. यंदाही या मॅरेथॉनमध्ये पाच ते ३३८ किलोमीटर पर्यंतचे वेगवेगळे टप्पे ठरविले आहेत. सह्याद्री फार्म्स आणि ब्ल्यू ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत देशातील तसेच जगातील आंतरराष्ट्रीय धावपटूही सहभागी होतील.

हे अल्ट्रा रनर्स ५०, १०० ते ३३८ किलोमीटर पर्यंतचे अंतर वेगवेगळ्या टप्प्यांत पार करतील. नियमित स्वरूपाची मॅरेथॉन ही १८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता सुरु होईल. त्यामध्ये ५ किमी, १० किमी, २१ किमी आणि ४२ किमी हे महत्त्वाचे टप्पे आहेत. या प्रत्येक टप्प्यात स्पर्धकांना बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.

यात स्पर्धकांना टी-शर्ट, फळांचे रस, प्रमाणपत्र आणि पदक मिळणार आहे. धावण्याबरोबरच झुंबासारख्या अन्य व्यायाम प्रकारांचाही यात समावेश असेल. स्पर्धेसाठी नाममात्र प्रवेशशुल्क असेल. नागरिकांनी सहभागासाठी सह्याद्री फार्म्सच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

''सशक्त शरीरात सशक्त मन असते, या म्हणीप्रमाणे आपल्या प्रत्येकाने शारीरिक आरोग्याचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. ही मुख्य भूमिका या उपक्रमामागे आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.''-विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार सपाट पातळीवर बंद! कोणते सेक्टर दबावात? जाणून घ्या आजचा मार्केट ट्रेंड

Baramati Plane Crash : बारामतीत अजितदादांच्या विमानअपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांची पोलिस ठाण्यावर धडक...

Lohgaon Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Latest Marathi News Live Update : 148 महाड MIDC मधील एम्बॉलो कंपनीला पुन्हा आग; परिसरात भीतीचे वातावरण

Baramati Plane Crash : बारामती विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने; सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती

SCROLL FOR NEXT