seat belt not wear by police
seat belt not wear by police esakal
नाशिक

SAKAL Exclusive : सर्वसामान्यांवर कारवाईचा दंडुका, पोलिसांना मात्र सवलत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रस्त्यावरील अपघातांना आळा बसावा, यासाठी कारचालकांना सीटबेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूक संदर्भातील कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. मात्र, वाहतूक पोलिसच जर वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर सर्वसामान्य वाहनचालकांकडून नियमांचे पालन करण्याची अपेक्षा तरी का ठेवावी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Violation of rules by traffic police issue of not using seat belt revealed Nashik news)

शहर पोलिस दलाच्या ताफ्यात असलेल्या चारचाकी पोलिस वाहनांचे चालकच सीटबेल्टचा वापर करीत नसल्याची गंभीर बाब ‘सकाळ’च्या पाहणीतून समोर आली आहे. त्यामुळे शहर पोलिसांना सामान्य नाशिककरांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्याचा अधिकार आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारचालक आणि त्यांच्याशेजारी बसणाऱ्या सहप्रवाशाने सीटबेल्ट वापरणे बंधनकारक आहे.

मात्र, काही महिन्यांपूर्वी राजकीय नेते विनायक मेटे व प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघातांचे गांभीर्य ओळखून कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शहरांमध्ये कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावले नसेल, तर त्यासंदर्भात दंडात्मक कारवाई शहर वाहतूक पोलिसांकडून केली जाते. या कारवाईमागे कारचालकाने सीटबेल्टचा वापर करावा हाच हेतू आहे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?‘त्यांच्या’वर कारवाई नाही

नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांसह सिग्नल आणि चौकांमध्ये शहर वाहतूक पोलिसांकडून विनासीटबेल्ट कारचालकांविरुद्ध कारवाई करून दंड वसूल केला जातो. मात्र यास नाशिक शहर पोलिस दलातील पोलिस वाहनचालक अपवाद ठरत आहेत. शहर आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, तपास अधिकारी, मुख्यालय आणि आयुक्तालयाकडे सरकारी चारचाकी वाहने आहेत. मात्र सरकारी पोलिस वाहनांवरील वाहनचालक विनासीटबेल्टच वाहने शहरभर चालवितात दिसून येतात. त्यांच्याविरोधात मात्र वाहतूक पोलिसांकडून कोणतीही दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही.

नियम सर्वांना एकसारखे

वाहतुकीचे नियम सर्वांना एकसमान असताना असा दुजाभाव का, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सामान्य कारचालकांवर विनासीटबेल्टचा दंड करून तो वसूल केला जातो. त्याचप्रमाणे, सीटबेल्ट न वापरणाऱ्या सरकारी व पोलिस वाहनांवरील चालकांवर वाहतूक शाखेकडून कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहर पोलिसांना सीटबेल्ट वापरण्याच्या नियमातून मुभा देण्यात आली आहे का, असाही सवालही उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT