crime esakal
नाशिक

कौटुंबिक संशयावरून पोलिस ठाण्याच्या आवारातच जबर मारहाण

सतिश निकुंभ

सातपूर (नाशिक) : शेजारी (Neighbors) खरा पाहारेकरी अशी अशी पोलिस (Police) खात्याची योजना होती या योजनेत शेजारी राहणारेच एकमेकाचे भाऊबंध अथवा सगेसोयरे तसेच सुखदुःखात धावून जावे असे संबध निर्माण व्हावे यासाठी या योजनेचा प्रभावी वापर एकेकाळी पोलिस विभागाकडून केला जात असे. पण सातपूर मध्ये मात्र त्या उलट प्रकार आज समोर आला एकमेकांच्या संशयावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की सातपूर पोलिस ठाण्याच्या समोरच लोखंडी सळ्यांनी मारहाण करत एकमेकांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी मुख्य त्र्यंबक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याने काही काळ वाहतूकीचाही खोळंबा झाला होता.

आलिशान राहणीमानाच्या नादात कौटुंबिक वातावरण मात्र लोप पावत आसून याच वातावरणामुळे घराघरात संशयाने जागा घेतली आणि रागाच्या भरात जे नको तेच घडायला लागले आहे.

सविस्तर वृत्त असे....

सिडको येथे अभिजीत भटकळ व सतिश शिंदे हे शेजारी राहत असलेल्या दोन कुटूंबात एकमेकांच्या चारित्र्याचा संशयावरून वाद होता, तो वाद मिटविण्यासाठी सातपूर स्टेट बँक समोर दोन्ही बाजूने लोक एकत्र आले पण चर्चे दरम्यान मात्र वाद कमी होण्या ऐवजी तो वाढला. यामुळे परीसरात एकच गर्दी जमली यामुळे सातपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी हजर होत हा घरगुती वाद रस्त्यावर न करण्याचा सल्ला देत त्यांना हटकले पण हे दोन्ही गट सातपूर पोलिस ठाण्यासमोर आले आणि पुन्हा वादाला सुरवात झाली त्यातील एका महीलेने फोन करून आपल्या नातेवाईकांना बोलवले आणि या नातेवाईकांनी समोरच्यावर लोखंडी सळ्यानी मारहाण केली.

यावेळी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. सातपूर त्र्यंबक रोडवरील सातपूर पोलिस स्टेशन समोरील परिसरात ही घटना घडली. या घटनेत तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सातपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज एका व्यक्तीचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Player Heart Attack Video : क्रिकेट खेळताना मैदानावरच खेळाडूला हृदयविकारचा तीव्र झटका; जागीच कोसळून मृत्यू

Property Tax : विरोधामुळे मिळकतकर वाढीचा निर्णय लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव पुढे ढकलला

Pali News : पशुपालकांना मोठा दिलासा! वीज बिलाच्या टेन्शनमधून सुटका; आता 'कृषी' दराने मिळणार वीज

Police Recruitment : मोठी बातमी! पोलिस भरतीला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ; १६३३ जागांसाठी तब्बल १.३९ लाख अर्ज

Latest Marathi News Live Update : पुण्यामध्ये लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT