Death News esakal
नाशिक

Nashik Crime News : सारस्वत बारमधील हाणामारीत वेटरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : अशोकनगरमधील सारस्वत बारमध्ये बुधवारी (ता. २६) रात्री श्रमिकनगरमधील तिघा संशयितांसोबत बिल न दिल्यावरून झालेल्या वादात सारस्वत बारमधील वेटर नितीशकुमार सिन्हा (वय ३२, रा. जाधव संकुल, सातपूर) यास जबर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. बार मालकासह संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. (Waiter died in brawl at Saraswat bar Nashik Latest Crime News)

दरम्यान, अशोकनगरमधील सारस्वत बारमध्ये बिलाच्या वादातून तिन्ही संशयितांनी जबर मारहाण केली व खुर्च्यांची मोडतोड केली. घरी आल्यानंतर वेटरचे काम करणाऱ्या नितीशकुमार सिन्हा यांना त्रास होत असल्याने कुटुंबियानी प्रथम सातपूर काॅलनीतील सार्थक हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता, तेथील डाॅक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच नितीशकुमार सिन्हा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वेळीच दखल न घेतल्याने बार चालकासह तिघा संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नितीशकुमारच्या कुटुंबियांनी नकार दिला.

या घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवित काही संशयितांना ताब्यात घेतले व नितीशकुमारच्या कुटुंबियांना कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचे समजले. नितीशकुमार गेल्या दहा वर्षांपासून बारमध्ये काम करीत होता. नितीशकुमारच्या मागे वृद्ध आई, दोन भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

Central Government Employees and Pensioners: दिवाळीआधी केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांना सरकारकडून मिळणार मोठा दिलासा!

Ashes 2025-26 : मॅथ्यू हेडन विवस्त्र होऊन MCG स्टेडियमला चक्कर मारणार? मुलगी ग्रेसची Joe Root ला एक विनंती, वाचा काय प्रकरण

Jan Aushadhi Kendra: आता घराजवळच स्वस्त औषधे मिळणार! हजारो जनऔषधी केंद्र उघडणार, नवा नियम कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT