Gajanan Khaire 
नाशिक

विनाअनुदानित शिक्षकांचा अन्नाविना ऊन- पावसात पायी दीडशे किलोमीटरचा प्रवास

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक / नाशिक रोड : शाळांना अनुदान मिळण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकाने औरंगाबाद ते विधान भवन अन्नत्याग करीत पायी मोर्चा काढला आहे. शाळांना शाश्‍वत व कायमस्वरूपी अनुदान मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे आंदोलक गजानन खैरे (औरंगाबाद) यांनी घेतली आहे.

रस्त्याने ऊन- पावसात पायी दीडशे किलोमीटरचा प्रवास
अनेक वर्षांपासून विनाअनुदानित, अंशतः विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील ६० हजार शिक्षक या प्रश्नांत भरडले जात आहेत. अशा शिक्षकांसाठी गजानन खैरे या २० टक्के अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकाने औरंगाबाद येथून विधान भवनापर्यंत पायी मोर्चा काढला आहे. सध्या ते निफाडपर्यंत आले असून, त्यांच्या मोर्चात रवींद्र महाजन (जळगाव), वसंत पानसरे (निफाड) यांनी सहभाग घेतला. गजानन खैरे यांच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे पोटात अन्नाचा एक कणही न घेता रस्त्याने ऊन- पावसात पायी दीडशे किलोमीटरचा प्रवास करून ते चालत आहेत.

ठिकठिकाणी मदत
खैरे यांनी औरंगाबाद येथून सुरू केलेल्या पायी आंदोलनात रस्त्यात ठिकठिकाणी त्यांना विविध विनाअनुदानित शिक्षक मदत करीत आहेत. शाळांना शंभर टक्के अनुदान देण्याबरोबरच शिक्षकांचे अनुदानाचे प्रश्न जोपर्यंत शासन कार्यवाही करून मिळत नाही, तोपर्यंत हा प्रवास विनाअन्नत्याग सुरू राहणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न नव्या सरकारने व शिक्षणमंत्र्यांनी मार्गी लावावा, यासाठी ६० हजार शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी विनाअन्नत्याग चालत आहे.-गजानन खैरे

रिपोर्ट -  हर्षवर्धन बोऱ्हाडे

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

HARDWORKING ZODIAC SIGNS: ‘या’ राशींचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण नशिबाची साथ कमी, दरवेळी हातातोंडाशी आलेलं यश हुकतं

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

SCROLL FOR NEXT