wall collapsed Four people were injured  sakal
नाशिक

नाशिक : भिंत कोसळून चार जण जखमी

चार घरांचे मोठे नुकसान; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भद्रकाली तलावडी परिसरात नवीन बांधकामासाठी जुन्या दुमजली घराचे तोडण्याचे काम सुरू होते. दरम्यान, त्या घराची भिंत मागील बाजूस असलेल्या अन्य चार घरांवर कोसळण्याची घटना शनिवार (ता. २९) सकाळी घडली. चारही घरांचे मोठे नुकसान झाले आहे, तर चार जण जखमी झाले आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तलावाडी परिसरात वीजेंद्र परदेशी यांचे दुमजली घर आहे. सध्याच्या घरात कोणीही राहत नाही. त्या ठिकाणी नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी शनिवार सुरवात झाली. तत्पूर्वी पूर्वीचे जुने घर असल्याने ठेकेदाराच्या माध्यमातून प्रथम ते घर पाडण्याचे काम हाती घेतले. शनिवारी सकाळी मजूर घर पाडत होते. दरम्यान, वरच्या मजल्याची भिंत त्या घराच्या मागे असलेल्या अन्य चार घरावर कोसळली. चारही घरातील संसार उपयोगी साहित्यासह संपूर्ण घराचे नुकसान झाले. परिसरातील युवकांच्या मदतीने घरातील रहिवासी बाहेर पडले. अग्निशामक दलास माहिती मिळताच लिडींग फायरमन इक्बाल शेख, फायरमन किशोर पाटील, तानाजी भास्कर, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर दराडे, शरद देटके बंबासह घटनास्थळी दाखल झाले.

घटनेत चार जण जखमी झाले आहे. त्यातील रिझवाना पठाण आणि सलीम पठाण गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अरबाज खान, फैज मेमन किरकोळ जखमी आहे. घडलेल्या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली होती. रिझवाना पठाण, अमजद मेमन, इम्रान खान आणि आफताब खान चौघांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. भिंत कोसळण्याची घटना घडताच ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

देव तारी त्याला कोण मारी

चारही घरांवर भिंत कोसळल्यानंतर घरांचे मोठे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही. रिझवाना पठाण यांच्या घरात पाच दिवसांची प्रसूत महिला होती. पाच दिवसांच्या बाळासह घरात असताना दोघेही मायलेक बचावले. घरात असलेल्या लोखंडी अँगलवर पत्रे आणि मलबा अडकून घराच्या अन्य भागात मलबा पाडला. महिलेचा बेड सुरक्षित राहिला. एका लोखंडी अँगलमुळे सर्वांचे प्राण वाचल्याने देव तारी त्याला कोण मारी, अशा प्रकारची चर्चा परिसरात होताना दिसली.

''वीजेंद्र परदेशी यांच्या घराची भिंत पडून चारही घरांचे नुकसान झाले आहे. कुठलीही काळजी न घेता तोडफोड करण्यात आल्याने ही घटना घडली. परदेशी यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी.''

- इम्रान खान, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT