Govind Dongre, a farmer selling grapes on the road, and a jammer attached to his vehicle in the second photo.
Govind Dongre, a farmer selling grapes on the road, and a jammer attached to his vehicle in the second photo. esakal
नाशिक

Nashik News : शेतकऱ्याला नवी मुंबईत रोखले अन..धाय मोकलून रडतानाच त्याने विचारले शेतकऱ्यांचे असे हाल का?

सकाळ वृत्तसेवा

चांदवड (जि. नाशिक) : आम्ही आता जगावं की नाही? शासन जगूही देत नाही अन् मरूही देत नाही. द्राक्षांना भाव नाही, व्यापारीही घेत नाहीत, म्हणून ती मुंबईत थेट ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न केला असता मुंबई महापालिकेचे (Municipal Corporation) अधिकारी विकू देत नाहीत. (Ward officials employees of Navi Mumbai Municipal Corporation installed jammers to prevent sale of grape farmer nashik news)

आमचे असे हाल का? असा उद्विग्न सवाल करीत दरसवाडी (ता. चांदवड) येथील शेतकरी गोविंद डोंगरे अक्षरशः रडले. मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाच ते सहा कॅरेट द्राक्षांचेही नुकसान केले व रस्त्यावर विक्रीही करू दिले नाही. मग सरकारची ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ ही संकल्पना कुठं गेली? महापालिकेला ती माहिती नाही का? असे प्रश्‍नही त्यांनी या अनुषंगाने उपस्थित केले.

गोविंद डोंगरे व त्यांच्या भावाची दरसवाडी येथे दोन एकर द्राक्षबाग आहे. लाखो रुपये खर्चून त्यांनी गोड द्राक्ष पिकविली. मात्र, व्यापारी तेवीस रुपये किलोने द्राक्षे मागत होते. त्यामुळे त्यांनी बुधवारी (ता. ८) पन्नास कॅरेट द्राक्षे घेऊन थेट मुंबई गाठली. नवी मुंबईत घनसोली येथे रस्त्यावर पन्नास रुपये किलो दराने दिवसभर काही कॅरेट द्राक्ष विकलेही. काही कॅरेट द्राक्ष उरल्याने ते रात्री मुंबईतच थांबले.

गुरूवारी (ता.९) सकाळी सहालाच ते ग्राहकांची वाट पाहात रस्त्यावर थांबले. सकाळी दोन-तीन कॅरेट द्राक्षांची विक्रीही झाली. मात्र, थोड्याच वेळात नवी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना द्राक्ष विक्री करण्यापासून रोखत हुज्जत घातली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

द्राक्षांच्या कॅरेटची ओढाताणही केली. यात द्राक्षांचे नुकसान झाले. त्यांच्या गाडीला त्यांनी जॅमरही लावले. त्यानंतर वॉर्ड कार्यालयात बोलावून दंड भरण्यास सांगितले. या वेळी त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. डोंगरेंनी नंतर प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर कांगुणे यांच्याशी संपर्क साधला.

त्यावर या दोघांनीही त्यांना धीर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे यांना याबाबत सांगितले. त्यावर त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना समज देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे सांगितले. अखेर, गाडीला बसविलेले जॅमर काढल्यानंतर डोंगरेंनी नाराज होऊन परतीचा मार्ग धरला.

"मुंबईतील अधिकाऱ्यांनी आम्हाला द्राक्ष विक्री करू दिले नाही. आमचं काय चुकलं होतं? आम्ही आमच्याच शेतातील द्राक्ष विकत होतो. मग असे का? आज मला त्रास झाला, उद्या इतरही शेतकऱ्यांना असाच त्रास देतील. मग आम्ही काय करायचं? यावर ठोस उपाययोजना व्हायला हवी. आमचा शेतमाल आम्हाला कुठेही विक्री करू द्यावा." -गोविंद डोंगरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, दरसवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT