Garbage News
Garbage News esakal
नाशिक

Nashik News : नाशिक शहरात कचरा वाढला की वाढवला? 250 टन कचरा वाढल्याने उठताय संशयाचे मोहोळ

विक्रांत मते

नाशिक : शहरात १ डिसेंबरला करारानुसार नियमित घंटागाडी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी ५२७ मॅट्रिक टन कचरा संकलित झाला. दहाव्या दिवशी मात्र ७७७ मॅट्रिक टन कचरा संकलित झाल्याने नेमका कचरा वाढला की वाढविला, यावरून संशयाचे मोहोळ उठले आहे. विशेष म्हणजे निश्चित करण्यात आलेल्या एकूण घंटागाड्यांपैकी जवळपास शंभर गाड्या रस्त्यावर उतरणे बाकी असतानादेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होत असेल तर यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (waste increase in city Doubts rise due to increase of two hundred and fifty tons of waste Nashik Latest Marathi News)

पावणेदोनशे कोटींचा घंटागाडीचा ठेका साडेतीनशे कोटींच्या वर पोचल्याने वादग्रस्त बनला. वर्षभरापासून ठेकेदारांना सातत्याने मुदतवाढ दिली गेली. मुदतवाढीचा सिलसिला १ डिसेंबरपासून नवीन घंटागाड्या सुरू झाल्यापासून संपुष्टात आला. यापूर्वी शहरात २७४ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन केले जात होते. नवीन अटी व शर्तीनुसार ८३ नवीन छोट्या गाड्या वाढविल्याने घंटागाड्यांची संख्या ३९८ इतकी झाली. करारानुसार पहिल्याच दिवशी सर्व घंटागाड्या रस्त्यावर उतरविणे अपेक्षित होते.

मात्र, मार्ग निश्चिती करण्यात विलंब झाल्याने टप्प्याटप्प्याने घंटागाडी रस्त्यावर उतरविली जात आहे. पहिल्या दिवशी २६४, दुसऱ्या दिवशी २७८, तिसऱ्या दिवशी २७९, तिसऱ्या दिवशी ३०२, चौथ्या दिवशी ३२२, पाचव्या दिवशी २००, दिवशी २९३ तर सातव्या दिवशी ३३० घंटागाड्या रस्त्यावर उतरण्यात आल्या. पहिल्या दिवशी ५२७ मॅट्रिक कचरा गोळा करण्यात आला. दहाव्या दिवशी कचरा नवीन घंटागाड्यांमध्ये कचरा संकलित होण्याचे प्रमाण ७७७ मॅट्रिक टन इतके आहे.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

दिवाळीतदेखील एवढा मोठ्या प्रमाणात कचरा संकलित झाला नव्हता. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा कसा वाढला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संपूर्ण घंटागाड्या रस्त्यावर उतरवल्याने तसेच पंचवटी व सातपूर विभागातून मोठ्या प्रमाणात कचरा संकलन वाढल्याने आकडा वाढल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केला आहे.

निर्माण होणारे प्रश्न?

- शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे का?
- लोकसंख्येत वाढ झाली नसेल तर कचरा वाढण्याचे नेमके कारण काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT