Herons flocking behind tractors during Chandori cultivation. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : बळीराजाच्या मशागतीवर ‘कॅटल इग्रेट’ चा वॉच! बगळ्यांची ट्रॅक्टरमागे गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Agriculture News : ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पिकांची कामे आटोपल्याने शेतकरी सध्या रिकाम्या शेतशिवाराची मशागत करण्यात व्यस्त आहेत.

मात्र, ही मशागत करीत असताना जमिनीच्या भेगांतून बाहेर पडून जीवजंतू खात गुजराण करणारे ‘कॅटल इग्रेट’ हे बगळे सध्या ट्रॅक्टरमागे लक्ष ठेवून आहेत. (Watch Cattle Egret on farmers cultivation Crowd of herons behind tractor Nashik Agriculture News)

बगळ्यांचा काही दिवसांपासून या पक्षांचा परिसरात सध्या राबता वाढला आहे. इंग्रजीत ‘कॅटल इग्रेट’ नावाने संबोधल्या जाणाऱ्या बगळ्यांना गाय बगळे अथवा ढोर बगळे या नावाने देखील ओळखले जाते. जमिनीतून निघणारे जीवजंतू हे त्यांचे मुख्य खाद्य.

त्याचबरोबर छोटे मासे, किडे, बेडूक, आळ्या, गोम, विंचू, सरडा आदींवर ही हे पक्षी ताव मारतात. त्यामुळे हे पक्षी समूहाने शेतात राहून शेतकरी शेत भिजवत असताना किंवा बैलाने नांगरट असताना शेतकऱ्यांच्या आसपास फिरताना दिसतात.

तर सूर्यास्तावेळी टोळके करून किंवा तिरक्या ओळी करून झाडावरील घरट्याकडे परततात. मात्र सध्या शेतकऱ्यांची शेत शिवारात मशागतीची कामे सुरू असल्याने हे पक्षी ट्रॅक्टरच्या मागे फिरताना दिसत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बळीराजाशी अतूट नाते

शेतीप्रधान अर्थ व्यवस्थेत अनेक रूढी परंपरेबरोबर जीवसृष्टीचा बळीराजाशी घनिष्ठ संबंध आहे. अनेक जीव शेतकऱ्यांच्या रोजच्या कामातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपला उदरनिर्वाह करतात.

त्यातील एक कॅटल इग्रेड हा शेतीच्या मशागतीच्या माध्यमातून भक्ष्य शोधतात व आपली उपजीविका करतात. सध्या शेतकरी बैलांच्या जागी ट्रॅक्टर आल्याने आता हे पक्षी ट्रॅक्टरमागे सुद्धा गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे बळीराजाशी यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT