Aurangabad city water supply issues water bill retun to citizen MP Imtiyaz Jaleel demand sakal
नाशिक

Nashik News: सव्वा लाख नागरिकांना पाणीपट्टी देयके वाटप होणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पाणीपट्टीची जेमतेम वसुली झाल्याने दिवाळीनंतर विविध कर विभागाकडून पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांकडे तगादा लावला जाणार असून, जवळपास सव्वा लाख नळजोडणी धारकांना येत्या आठ दिवसात पाणीपट्टीची देयके वाटप केली जाणार आहे. (Water bill payment will be distributed to one lakh citizens nashik news)

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर त्यासाठी महापालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने घर व पाणीपट्टीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

मागील सात महिन्यात घरपट्टीच्या माध्यमातून १३८ कोटी रुपये वसूल झाले. मागील वर्षाच्या तुलनेत ३२ कोटींहून अधिक घरपट्टी वसुली झाली आहे. घरपट्टी वसुलीसाठी २२५ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

घरपट्टीची वसुली समाधानकारक असली तरी पाणीपट्टीची वसुली जेमतेम ३४ टक्के झाली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी ७५ कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यापैकी २५ कोटी ६४ लाख रुपये वसुली झाली आहे.

त्यामुळे दिवाळीनंतर करवसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना नोटीस बजावली जाणार आहे. महापालिका हद्दीमध्ये २ लाख सात हजार ३९१ नळजोडणीधारक आहे. त्यापैकी एक लाख ८३ हजार नळजोडणीधारकांना देयके वाटप करण्यात आली. उर्वरित देयके येथे आठ दिवसात वाटप केले जाणार आहे. देयकांचे वाटप करण्यासाठी पंधरा दिवसांची मदत देण्यात आली आहे.

"पाणीपट्टीची जेमतेम ३४ टक्के वसुली झाल्याने दिवाळीनंतर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. मुदतीच्या आत थकबाकी अदा न करणाऱ्या थकबाकीदारांवर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे." - श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT