नव्याने तिसरा जलकुंभ बांधण्याचे गुरवारी सुरु असलेले काम
नव्याने तिसरा जलकुंभ बांधण्याचे गुरवारी सुरु असलेले काम esakal
नाशिक

Water Crisis in City : धरणात मुबलक, पण नळाला थेंबथेंब पाणी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सलग दुसऱ्या वर्षी पावसाने जोरदार हजेरीमुळे यंदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह अन्य धरण समूहात नव्वद टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे. मात्र, याही स्थितीत पंचवटीतील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यातच भल्या पहाटे नळाला पाणी येत असल्याने महिलांना थंडीच्या दिवसांत हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

याबाबत मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लुंगे मंगल कार्यालयाजवळील बांधकाम चालू असलेल्या तिसऱ्या पाण्याची टाकी पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. (Water Crisis in City Situation in many areas of Panchvati Nashik News)

पंचवटीतील जुन्या आडगाव नाका, टकलेनगर, सहजीवननगर, गणेशवाडी, मुंजोबा चौक आदी भागात अतिशय कमी दाबाने तेही अवेळी होत असल्याने महिला वर्ग त्रस्त आहेत. औरंगाबाद रोडलगतच्या स्वामिनारायण नगर येथील पाण्याच्या दोन टाक्यांमधून थेट आयुर्वेद सेवा संघापर्यंतच्या भागात पाणीपुरवठा होतो.

या ठिकाणी १९९२ ला बांधण्यात आलेला जलकुंभ धोकादायक स्थितीत असल्याने मध्यंतरी तोडण्यात आला असून त्या जागेवर नवीन जलकुंभाचे काम सुरू झाले आहे. या भागात २००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात २२. २५ लाख क्षमतेची व त्यानंतर २०१५ च्या सिंहस्थात २० लाख लिटरची नवी टाकी उभारण्यात आली आहे. आता सुरू असलेल्या तिसऱ्या टाकीचे काम पूर्ण झाल्यावर सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्‍वासन अधिकारी देत आहेत.

भल्या पहाटेच येते पाणी

शहराच्या विविध भागात पाणीपुरवठ्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. तरीही खूप पूर्वीपासून गावठाण भागात सकाळ, सायंकाळ असा दोन वेळेस पाणीपुरवठा होतो. पूर्वी सकाळी सहा वाजता पाणी येत असे व दोन तासांनी म्हणजे आठपर्यंत तो सुरू असे. सध्या पहाटे पाच ते साडेसहा ते पावणेसातपर्यंत नळाला पाणी येते. हा पुरवठा पाचऐवजी सहा वाजता सुरू करावा, अशी महिला वर्गाची मागणी आहे.

चोवीस तास पाणी नकोच

स्मार्टसिटीतंर्गत शहराच्या गावठाण भागात चोवीस तास पाण्याचे नियोजन आहे. मात्र, यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होण्याची शक्यता असल्याने मर्यादित वेळेतच परंतु योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आहे.

"सहजीवननगर भागात गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी दहा पंधरा मिनिटे वाट पहावी लागते."

- विमला पगारे, गृहिणी, सहजीवननगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT