Jayakwadi nashik news  esakal
नाशिक

Jayakwadi Dam: गंगापूर, कडवा, मुकणेचे पाणी आज जायकवाडीला

सकाळ वृत्तसेवा

Jayakwadi Dam : दारणा धरणाचे पाणी जायकवाडीला सोडल्यानंतर आता गंगापूर, कडवा व मुकणे धरणांतून रविवारी (ता. २६) सकाळी पाणी सोडण्यात येणार आहे. पाचशे क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होणार असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. (Water from Gangapur Kadwa Mukne dam to Jayakwadi today nashik news)

गंगापूर धरण समूहातून एकूण ३.१४३ टीएमसी पाणी सोडायचे आहे. साधारणतः दोन दिवसांत पाणी जाईल, असा अंदाज असल्यामुळे टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीपात्रातील वस्तू, साहित्य, मोटारी, वाहने इत्यादी पात्राच्या बाहेर काढून घ्यावे. नदीप्रवाहात कुणीही प्रवेश करू नये. नदीपात्राजवळील धार्मिकस्थळी, तसेच पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

दरम्यान, दारणा धरणातून शनिवारी (ता. २५) दिवसभर १९२ क्यूसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरू होता. धरणामधून प्रारंभी १०० क्यूसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग केल्यानंतर सकाळपर्यंत त्यात ९२ क्यूसेकची वाढ करण्यात आली. पुढील ४८ तासांमध्ये जायकवाडी धरणात हे पाणी पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाण्यावर मराडवाड्याची तहान भागणार आहे.

जायकवाडी धरणामध्ये ६५ टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व नगर जिल्ह्यांमधून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पारित केले होते.

त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहामधून एकूण ३.१४३ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. पाटबंधारे विभागाने पहिल्या टप्प्यात दारणा समूहातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वहन मार्गामध्ये पाणीचोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत डोंगळे तोडण्यात आले. नदीकाठावरील गावांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT