Farmers present at Jalsankirtan to create awareness about irrigation project of Devana. In the second photo, farmers and protestors in a police meeting. esakal
नाशिक

Nashik News: जलआंदोलनाला संत विचारांचा आधार! देवदरी येथे जलसंकिर्तन परिषद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्पापुढील अडचणी तातडीने सोडवा, अन्यथा संघर्ष अटळ आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करत असताना, मुंबईत आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर विषयांवर लाभक्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन करण्यासह शासनाला जागे करण्यासाठी जलहक्क संघर्ष समितीने गावोगावी जल संकीर्तन परिषदा आयोजित केल्या असून आज देवदरी येथे याला प्रारंभ झाला. (water movement supported by thoughts of Saints Jalasankirtan Parishad at Deodari Nashik News)

देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करा, साठवण तलावात पाणी आडवा आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून द्या अन्यथा आमचा संयम आता संपला आहे. पाण्याची वाट बघणारे अनेक शेतकरी पाणी न बघताच मरण पावले.

अजून किती वर्षे पाण्याची वाट बघायची? अडलेले पाणी दाखवण्यासाठी धडक कृती कार्यक्रम राबवा अन्यथा येत्या २९ जूनला आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे चारला मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा देवनाचा सिंचन प्रकल्पाच्या प्रस्तावित लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला आहे.

यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. आंदोलनकर्ते शेतकरी मात्र आजूबाजूच्या गावात आता जनजागृती करून लक्ष वेधू लागले आहे.

देवनाचा सिंचन प्रकल्पासमोरील अडचणी, सद्यःस्थिती आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका या विषयांवर लाभक्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी आज देवदरी येथे पहिली जल संकीर्तन परिषद झाली.

यावेळी १२ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी मांडलेले, जल, जंगल आणि जमीन याविषयी दूरदर्शी विचार समजून सांगण्यात आले. त्यासाठी ‘नगरेची रचावी । जलाशये निर्मावी ।। महावने लावावी । नानाविध ।। या ज्ञानेश्वरीतील १४ व्या अध्यायातील ३३ व्या ओवीचा आधार घेतला.

तालुक्यातील शेती सिंचनासाठी लागणारे पाणी, सिंचन व्यवस्था, साठवण बंधारे, कालव्याचे पाणी, पेयजल आदी बाबी गांभीर्याने न पाहिल्याने पाणी, जमीन, वन, पर्यावरण या विषयी गंभीर समस्या तयार झाल्या आहेत.

येत्या काळात पाण्यावरून श्रीमंती मोजली जाणार आहे तेव्हा सरकार दरबारी आपल्या मागण्या रेटून जल समृद्ध व्हावे असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस प्रशासन सतर्क

मुंबईत आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनाची प्रत पोलिस महासंचालकांना पाठवली आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व प्रमुख ३० कार्यकर्त्यांसोबत तालुका पोलिस स्टेशन येथे बैठक घेण्यात आली.

फौजदारी दंड संहिता १९७३ च्या कलम १४९ अन्वय्ये प्रतिबंध कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक विशाल क्षीरसागर यांनी ही नोटीस बजावली आहे.

अर्थात देवनाचा प्रकल्प होण्यासाठी शेतकरी मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून आता नाही तर कधीच नाही अशी भूमिका सोनवणे यांनी मांडली आहे.

एकादशीपर्यंत जलसंकीर्तन परिषदा

देवनाचा सिंचन प्रकल्प समितीमध्ये २३७७ सदस्य असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून किमान १० हजार शेतकरी, कष्टकरी, भूमिहीन, आदिवासी मत्सव्यवसाय करू शकणारे आदिवासी बांधव आहेत. यातील ९० टक्के लाभार्थी हे अशिक्षित अथवा अल्प अशिक्षित आहेत.

त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून, प्रकल्पा समोरील अडचणी, सद्यःस्थिती आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका या विषयांवर लाभ क्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन केले जात आहे.

त्यासाठी येवला तालुक्यातील रहाडी, खरवंडी, देवदरी हे प्रत्यक्ष लाभार्थी तर कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, भारम येथील प्रत्यक्ष लाभार्थीं तसेच वनसंवर्धन राखीवमुळे सिंचन प्रकल्प अडचणीत आले आहेत.

त्या गावात ममदापूर, राजापूर, कोळगाव, वाई बोथी, न्याहारखेडे खुर्द, न्याहारखेडे बुद्रुक, सोमठाण जोश या गावातील जनजागरासाठी आषाढी एकादशीपर्यंत जलसंकीतर्न परिषदा सुरू राहणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT