Water supply to 26 villages has been disrupted nashik marathi news 
नाशिक

पावसाळ्यातही दहीवाळसह २६ गावे तहानलेली; वितरण व्यवस्थेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्रामस्थांचे हाल

राजेंद्र दिघे

नाशिक/मालेगाव कॅम्प : गेल्या अनेक वर्षांपासून दहीवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळित झाली आहे. आता ऐन पावसाळ्यात या गावातील महिलांना पायपीट करून पाणी आणावे लागले. गत पंधरवड्यात धो धो पाऊस असताना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली होती. हे केवळ होत आहे जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे. 

या समस्येप्रकरणी माळमाथा परिसरातील युवकांनी उपअभियंता ए. एम. पगार यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करत जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गिरणा डॅम ते दहीवाळ या एक्स्प्रेस जलवाहिनीत वीजपुरवठा अडसर ठरत असल्याची सबब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे केली. त्यामुळे संतप्त तरुणांनी पावसाळ्याच्या दिवसांत अशी वेळ असेल तर उन्हाळ्यात काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला. २६ गावांत नियमित पाणीपुरवठा दर तीन दिवसांनी व्हावा, गावात व सर्व वॉर्डांत समान जल वितरण व्हावे यासाठी गावात पाण्याची विभागणी करून व्हॉल्व्ह बसवावे, संबंधित कर्मचाऱ्यांनी नियोजनाप्रमाणे गावावर उपस्थित राहावे, अशा मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले.  या शिष्टमंडळात नाळेचे माजी सरपंच दिलीप कोते, संदीप दिघे, बोधे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल नरवाडे, संदीप शिंदे, सतीश रकटे, भूषण सोनवणे, किरण नरवाडे, आबा कदम, ललेश व्याळीज, गणेश शिंदे, भूषण नरवाळ आदी सहभागी होते. 


पाणी योजनेतील गावे - २६ 
जलसेवक - ९ 

माळमाथ्याच्या परिसरात गिरणा धरण असताना शहराला सुरळीत पाणीपुरवठा होतो. ग्रामीण भागातील जनतेस ऐन पावसाळ्यात पायपीट करावी लागते. पाणीपुरवठा व वीज वितरण यांनी परस्पर समन्वय ठेवून तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरळीत करावा. 
-संदीप शिंदे, शेंदुर्णी 
 
एक्स्प्रेस जलवाहिनीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गळतीसारख्या समस्या निर्माण होतात. गावांची संख्या पाहता एका जलसेवकाकडे तीन गावे आहेत. कमी दाबाऐवजी पूर्ण क्षमतेने वीज मिळावी. 
-ए. एम. पगार, उपअभियंता, जीवन प्राधिकरण, मालेगाव 

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने वीज ब्रेकडाउन झाली. शेतीपंपाची मागणी वाढून लोड आला. नवीन पीन इनस्युलेटर बदली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापुढे नियमित वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. 
-योगेश सांगोरे, सहाय्यक अभियंता, वीज वितरण दहीवाळ 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Latest Marathi News Updates: राऊतांचं स्कील भल्या भल्यांना आत्मसात करता येणार नाही - आव्हाड

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT