water supply at low pressure for month in Old Cidco nashik news 
नाशिक

Nashik Water Supply: जुने सिडकोत महिनाभर कमी दाबाने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: सिडको विभागात प्रभाग क्रमांक २४ मधील लेखानगर जलकुंभातून पाणीगळती सुरू झाल्याने जलकुंभ दुरुस्तीचे व जलकुंभाचे वॉटर प्रुफिंग करण्याचे काम तातडीने सुरू केले जाणार आहे. (water supply at low pressure for month in Old Cidco nashik news)

पाणीपुरवठा विभागामार्फत लेखानगर जलकुंभ दुरुस्ती व वॉटर प्रुफिंगचे काम ४ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४ पर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे जलकुंभावरून ज्या भागात पाणीपुरवठा होतो त्या भागात बायपासने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर लेखानगर जलकुंभावरून कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

प्रभाग क्रमांक २४ मधील स्टेट बँक कॉलनी, पीरबाबा चौक, राणाप्रताप चौकातील भाग, मृत्युंजय महादेव मंदिर, झीनत कॉलनी, इंदिरानगर वसाहत १- २, बालभारती, तुळजाभवानी चौक, जुने सिडको, शिवाजीचौक परिसर, अचानक चौक, सारंग चौक, वंदेमातरम चौक, शनि मंदिर परिसर, एन-३ एल सेक्टर, एन-९ पीजी, लेखानगर मिलटरी कॉलनी, गजानन चौक, सप्तशृंगी चौक परिसर, महादेव चौक, खंडेराव परिसर, गोपाळकृष्ण चौक या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. लेखानगर जलकुंभ दुरुस्तीचे व वॉटर प्रुफिंग करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT