Water Supply esakal
नाशिक

नाशिक : सिन्नरकरांना दिवसाआड पाणी

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : चार-चार दिवसांनी येणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त झालेल्या सिन्नरकरांना रोज पाणी मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाने केलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आले असून, नगर परिषदेने चार दिवसांऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीपुरवठ्याबाबत कुठलीही तक्रार असल्यास सिन्नरकरांनी भाजपच्या कार्यालयात अथवा शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

सिन्नर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली शंभर कोटींची पाणीपुरवठा योजना कडवा धरणावर राबवण्यात आली. ही योजना पूर्ण झाली असतानाही शहराला मुबलक पाणी मिळत नाही. दारणावरील जुनी योजना सुरू असताना सिन्नरकरांना चार दिवसांनी पाणी का येते, असा प्रश्न उपस्थित करत भाजपने मुख्याधिकारी संजय केदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्या वेळी केदार यांनी दोन दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे ५ मेपासून शहरासह उपनगरांमध्ये दिवसाआड ४० मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे भाजपच्या आंदोलनाचे यश आहे. मात्र, यावरच समाधान न मानता शहरवासीयांना रोज मुबलक व पुरेसे पाणी मिळवून देईपर्यंत भाजप शांत बसणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पाण्याच्याबाबतीत कुणाचीही काहीही तक्रार असेल, तर त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयात याबाबत तक्रार करावी अथवा शहराध्यक्ष मनोज शिरसाठ, महिला शहराध्यक्षा मंगला झगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. त्यावर मार्ग काढून अडचण दूर करण्याची जबाबदारी भाजपची असेल असेही या पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

Pune News: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

SCROLL FOR NEXT