water supply scheme esakal
नाशिक

Nashik: वीजबिल थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना संकटात! वावी ग्रामस्थांकडून अनामत रकमा जमा करून योजना सुरू ठेवण्याची कसरत

वावीसह ११ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्यामुळे ‘महावितरण’कडून वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येतो.

सकाळ वृत्तसेवा

वावी : वावीसह ११ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्यामुळे ‘महावितरण’कडून वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येतो.

योजनेत सहभागी असणाऱ्या गावांकडून योजना चालविण्यासाठी पैसे दिले जात नसल्यामुळे सर्वांत मोठे असलेल्या वावी ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना वीजपुरवठा खंडित झाल्यावर नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

ग्रामस्थांकडून वेळेवर पाणीपट्टीचा भरणा होत नाही. योजनेतील गावेही प्रतिसाद देत नसल्यामुळे वावीचे सरपंच विजय काटे यांना गावातील सदन व्यक्तींकडून अनामत रकमा घेऊन योजना सुरळीत ठेवण्याचे दिव्य पार करावे लागत आहे. (Water supply scheme in crisis due to electricity bill arrears Efforts to continue scheme by collecting deposits from vavi villagers Nashik)

वावीसह ११ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरवातीपासूनच चर्चेत आहे. कधी अशुद्ध पाणीपुरवठा, तर कधी वीजबिल न भरल्यामुळे ‘महावितरण’कडून झालेली कारवाई. यातील एक बाब निस्तरावी, तर दुसऱ्या बाबीसाठी पैसे शिल्लक राहत नाही, अशी अवस्था या योजनेची आहे.

सहा महिन्यापासून पंचायत समितीस्तरावर योजनेतील गावांचे सरपंच ग्रामसेवकांची बैठक घेऊन योजनेचा खर्च चालविण्यासाठी गावनिहाय निश्चित केलेला सहभाग देण्यात टाळाटाळ होत आहे.

योजनेत सहभागी अन्य गावे आम्हाला पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था आहे, असे सांगतात किंवा गावातील नागरिकांकडून थकबाकी वसूल होत नसल्याचे कारण देऊन योजनेच्या व्यवस्थापन समितीकडे पैसे द्यायला नकार देतात, असे योजनेचे अध्यक्ष व सरपंच काटे यांचे म्हणणे आहे.

सहा महिन्यांत तीनवेळा महावितरणने वीजबिल भरले नाही, म्हणून योजनेचा वीजपुरवठा खंडित केला. प्रत्येकवेळी वावी ग्रामपंचायत शक्य होईल तेवढी रक्कम देऊन वीजपुरवठा सुरळीत करून घेते.

आता दोन दिवसांपूर्वी योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पाण्याअभावी लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरपंच काटे यांनी गावातील सदन व्यक्तींकडून एक लाख रुपये अनामत रक्कम ग्रामपंचायत खात्यावर भरून घेतली व ‘महावितरण’ला धनादेश देऊन वीजपुरवठा सुरळीत केला.

योजनेचा सर्वाधिक फायदा वावीकरांना झाला आहे. गावासाठी पाणीपुरवठ्याची अन्य पर्यायी योजना नसल्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील पाणीपट्टी व करांचा भरणा करावा. जेणेकरून पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवून संभाव्य पाणीटंचाईतून मार्ग काढता येईल, असे आवाहन सरपंच काटे यांनी केले आहे.

"योजनेतील गावांचे सरपंच व ग्रामसेवक सहभाग हिस्सा द्यायला टाळाटाळ करीत असल्याने एकट्या वावीवर योजनेच्या वीजबिलाचा भार पडला आहे. जवळपास १२ लाख रुपये वीजबिल थकले आहे. महिन्याला सुमारे दीड लाख रुपये वीजबिल येते. प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत फंडातून वीजबिलाची रक्कम देणे शक्य होत नाही. त्यामुळे गावातील समविचारी युवकांकडून अनामत रकमा घेतल्या व पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरले. अनामत रक्कम एक महिन्यांनी परत करण्याचा संबंधितांना वायदा केला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही योजनेतील गावे सहकार्य करत नाही. त्यामुळे पुढील काळात योजना चालविणे अवघड आहे."

-विजय काटे, सरपंच, वावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize in Medicine 2025: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर! मेरी ई. ब्रन्को, फ्रेड रॅम्सडेल अन् शिमोन सकागुची ठरले पुरस्काराचे मानकरी

Vijay Deverakonda Accident:'डोक्याला मार लागलाय', अपघातनंतर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया, म्हणाला...'दुखतय पण...'

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Kolhapur Lodge Raid : गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्...

IT Sector: कर्मचारी कपातीसाठी ‘आयटी’चा नवा डाव; क्रेडिट कार्ड बिलांसह, वैयक्तिक पार्श्‍वभूमीचीही पडताळणी

SCROLL FOR NEXT