water supply news esakal
नाशिक

Water Supply News : म्हसरूळ, बोरगडला पाणीपुरवठा उद्या बंद राहणार!

विक्रांत मते

नाशिक : पंचवटी विभागातील म्हसरूळ, बोरगड भागात शनिवारी (ता. ७) उर्ध्ववाहिनी गळतीची दुरुस्ती होणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील म्हसरुळ व बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनीला पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राजवळ आणि आरटीओ ऑफिसजवळ गळती लागली आहे. सदर काम तातडीने करणे आवश्यक आहे. (Water supply to Mhasrul Borgad will be closed on saturday nashik news)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

उर्ध्ववाहीनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे म्हसरुळ व बोरगड जलकुंभावरून प्रभाग १ आणि प्रभाग ६ मध्ये पाणीपुरवठा होणार नाही. प्रभाग एकमधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरी रोड राणा हॉटेलपर्यंत, म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवरील पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरुळ गावठाण,

संभाजीनगर, बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर, आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर परिसर, पेठ रोड, जकात नाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर तसेच प्रभाग ६ मधील कल्याणी व राजेय सोसायटी, मेहेरधाम, गॅस गोडाऊन, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठ रोड, जकात नाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर,

डीटीपीनगर परिसरात शनिवारी दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी (ता. ८) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT