A wheat farm standing in the field in the area.
A wheat farm standing in the field in the area. esakal
नाशिक

Weather Crop Damaged : ढगाळ हवामानामुळे गव्हावर तांबेरा तर हरभरावर घाटे अळीचा प्रादूभार्व!

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : अधूनमधून तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे. त्यामुळेच हरभरा व गव्हाच्या उत्पादनात घट येईल अशी भीती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

वातावरणातील बदलामुळे कांदा पिकांवर करपा आणि फुलकिड, गव्हावर तांबेरा तर हरभरा यावर घाटे अळीचा पार्दुभाव होण्याची शक्यता असल्याने रब्बीमधील पिकांना हवामानाचा फटका बसू नये यासाठी गहू, हरभरा यावर औषध फवारणी करण्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. (Weather Crop Damaged Due to cloudy weather wheat damaged and gram affected by ghat worm nashik news)

तालुक्यात पावसाळ्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा आदी पिकांचे उत्पादन घेतात. अपेक्षित नसताना अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होते. दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकांना सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते.

मात्र ढगाळ वातावरणामुळे हंगामातील पिके घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे गव्हावर तांबेरा तर हरभरा यावर घाटे अळीचा प्रार्दुभाव होईल त्यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी तालुका कृषी विभागामार्फत नुकतेच जिल्हा मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

या चर्चासत्रात जिल्ह्यातील पीकनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला त्यानुसार सध्याचे हवामान ढगाळ आणि रात्रीचे दव यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने पिकांसाठी उपाययोजनांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

या औषधांची करावी फवारणी

- कांदा : टेब्यूकोनेझोल (फोलीक्युअर) १० मिली, फिप्रोनील (रिजंट) १५ मिली, स्टीकर १० मिली, १० मिली पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या.

- द्राक्षे : डायफेनकोनॉझोल ५ मिली, प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

- गहू - पिक ५०-५५ दिवसाचे झाल्यावर १९ : १९ : १९ या विद्राव्य खताची (२ टक्के) फवारणी, २०० ग्रॅम खत १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी. ७०-७५ दिवसांनी दुसरी फवारणी.

- हरभरा - घाटे अळीच्या नियंत्रणासाठी

क्लोरान्ट्रानिपोल १८.५ एस.सी १० मिली किंवा इमामेकटीन बेन्झोएट ५ एस.जी ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT