Gokula Shelke while extracting the edge of buffalo milk. esaka
नाशिक

Weather Effects : वातावरणामुळे दुभत्या जनावरांच्या क्षमतेवर परिणाम! 10 लिटर मागे सरासरी 2 लिटरची घट

प्रभाकर बच्छाव

येसगाव (जि. नाशिक) : गाव व परिसर बागाईत असल्याने सूर्योदयापूर्वी थंडी व अकरानंतर कडक ऊन लागते. या बदलत्या वातावरणाचा परिणाम परिसरातील दुभत्या जनावरांवर जाणवू लागला आहे.

या वातावरणामुळे दहा लिटर दूधामागे सरासरी दोन लिटरची घट येत असल्याचे पशुपालक सांगत आहे. (Weather Effects Effects on ability of dairy animals due to environment Average reduction of 2 liters after 10 liters Nashik News)

पहाटे चार पासून व दुपारी चार नंतर गाई-म्हशींचे पशुपालक यांच्याकडून नियमित दूध काढले जाते. त्यामुळे एक वेळा थंडीत व एक वेळा उन्हात दूध काढले जाते. यातच तालुक्यातील काही भागांमध्ये चारा टंचाई जाणू लागल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ग्रामीण भागात दिवसेंदिवस संकरित गाईंची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याला मागणी वाढली आहे. परिसरात फळबागा वाढल्याने शेतकरी नगदी पिकाकडे वळला आहे. विहिरींना पाणी चांगले असले तरी हिरव्या चाऱ्यासाठी लागणारे खोंडे (ज्वारी) घास , बाजरी, मका, चवळी यासारखे हिरवळीचे पीक घेतले जात नाही.

परिसरात उसाची लागवड घटल्याने हिरव्या चाऱ्यासाठी मिळणाऱ्या उसाच्या बांड्या मिळत नाहीत. बाहेरून आलेल्या बांड्यांचा भाव नगावर घ्यावा लागत आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

बऱ्याच भागात शेवटी अवकाळी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील बाजरी, मका,ज्वारीचा चारा खराब झाला. त्यामुळे कोरड्या वैरणी चाऱ्याचाही प्रश्न शेतकऱ्यांकडे निर्माण झाला आहे.

वेगवेगळ्या कंपनी सरासरी भाव ६० किलो साठी सरकी ढेप एक हजार ९०० रुपये, चुनीभरडा ५० किलोसाठी अकराशे १ हजार ०२० रुपये घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांजवळ संकरित गायी व एक लाखाच्या पुढे किमती असलेल्या म्हशी आहेत. जनावरांसाठी संतुलित आहार कमी पडू लागल्याने त्याचाही परिणाम दुभत्या जनावरांवर होऊ लागला आहे.

दूध देणाऱ्या गावरान, सिन्नर, म्हसान, गिर-जाफर ,काठेवाडी, माळवी सारख्या जातीच्या म्हशी आहेत. म्हशींच्या किमती एक लाखाच्या आसपास आहेत. दूध उत्पादन करणारा कोरडा, हिरवा चारा व पशुखाद्य हे सर्व घटक महाग झाले आहेत.

"वैरण टंचाईमुळे दुग्ध व्यवसाय जिकिरीचा झाला आहे. दुधात घट येऊ लागल्याने गायी- म्हशी पालन दिवसेंदिवस खर्चिक होऊ लागला आहे."- सुनील सूर्यवंशी,पशुपालक, येसगाव बुद्रूक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT