Rain Update News esakal
नाशिक

Nashik Rain Update : पावसाच्या शक्यतेमुळे टंचाईने त्रस्त यंत्रणा सुखावली

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्रतेमुळे सव्वा लाखांहून अधिक नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाळा लांबणार या भीतीने ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवावे लागेल, या भीतीने शहरात दर शनिवारी पाणी कपातीची घोषणा झाली.

पण आता जूनमध्येच मॉन्सून जिल्ह्यात बरसणार असल्याच्या हवामान विभागाच्या अंदाजामुळे टंचाईला तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असलेली यंत्रणा मात्र सुखावली आहे. (weather forecast of possibility of rain early nashik news)

जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र आहेत. १ लाख २२ हजाराहून अधिक लोकसंख्या पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील ६६ गाव आणि ५१ वाड्यासह साधारण ११७ ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. १३६ हून अधिक टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

यंदा पावसाळा लांबू शकतो, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानंतर केंद्रांकडून राज्यांना सूचना आल्या. राज्यस्तरावरून जिल्हा स्तरावर पाण्याच्या योग्य नियोजनाच्या सूचना दिल्या गेल्या नाशिकला पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेची पाणी टंचाई आढावा बैठक घेत पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात येवला तालुक्यात ५२ चांदवडला २०, मालेगाव १६, इगतपुरी १३, बागलाणला ११, पेठ आणि सुरगाणा प्रत्येकी १० टँकरने सव्वालाखाहून अधिक मोठ्या लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक महापालिकेने एक पाऊल पुढे जाऊन जून ते ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शनिवारी पाणीकपात करीत, पाणी पुरविण्याचे जाहीर केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र अशातच आता पुन्हा केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला असून आठवडाभरात जिल्ह्यात पावसाची हजेरी लागेल. तसेच जूनच्या पहिल्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी नियोजनात व्यस्त असलेल्या यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

पावसाचा अंदाज

हवामान विभागाने दोन दिवसांत मॉन्सूनचा पाऊस सुरु होईल, असा अंदाज वर्तविला आहे. महिन्यात पुन्हा पुढील दोन आठवड्यात पावसाचा जोर राहील, त्यामुळे जून महिन्यात पाऊस होणार असल्याने टंचाई स्थितीला तोंड देत नियोजनात व्यस्त असलेल्या यंत्रणेला दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : गांजा खरेदी करण्यासाठी पैशाचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील दोन महिलांना पोलिसांनी केली अटक

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT