Wedding Esakal
नाशिक

नाशिककरांंनो, लग्न समारंभात कोरोनाचे हे नियम पाळा

विक्रांत मते

शहरात लॉकडाऊनमुळे अनेकांना लग्न समारंभ हे पुढे ढकलावे लागले दरम्यान आता कोरोनाचे निर्बंध शिथील होताच बरेच जण कार्यक्रम उरकून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत

नाशिक : कोरोना (Coronavirus) माहामारीचे थैमान सुरु असताना लग्न सोहळ्यांवर (Wedding Ceremony) बंधने घालण्यात आली होती. मात्र जानेवारी महिन्यात नियंत्रणात आलेल्या कोरोना संसर्गाने मार्च महिन्यात उच्चांकी पातळी गाठण्यामागे लग्न समारंभांना होणारी गर्दी कारणीभूत ठरली. या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभ, दुकाने सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी दिला. (Wedding organizers will have to follow government guidelines in Nashik)

शहरात लॉकडाऊनमुळे अनेकांना लग्न समारंभ हे पुढे ढकलावे लागले दरम्यान आता कोरोनाचे निर्बंध शिथील होताच बरेच जण कार्यक्रम उरकून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने या सोहळ्यांना परवानगी दिली असेल तरी विवाह कार्यक्रम आयोजक आणि लॉन्स चालकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे

काय आहेत नियम?

शासन निर्णयानुसार लग्नसमारंभ सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जास्तीत- जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. समारंभ करण्यासाठी महापालिकेचे विभागीय अधिकारी, स्थानिक पोलिस स्टेशनकडून कार्यालय, लॉन्स धारकांना परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कमीत-कमी तीन दिवस अगोदर वधू-वर पक्षाने संबंधित महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना रीतसर माहिती कळविणे बंधनकारक आहे. परवानगी आदेशाचे प्रथम उल्लंघन झाल्याचे पोलिसांकडून लॉन्स धारकांवर वीस हजार रुपये, वधू-वर पक्षावर प्रत्येकी दहा हजार, असे चाळीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास कोविड अधिसूचना रद्द होईपर्यंत सीलबंद कार्यवाही होईल.

अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने, दूध, वृत्तपत्रे विक्री, भाजीपाला व फळांचे दुकाने शासन निर्देशांचे पालन करून सायंकाळी ४ पर्यंत आठवडाभर सुरू राहतील. इतर दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सांयकाळी चारपर्यंत सुरू राहतील. गर्दीचे विकेंद्रीकरण करून शारीरिक अंतराचे पालन करणे, मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. दुकानदारांकडून प्रथम उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये व ग्राहकाला एक हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास कोविड अधिसूचना रद्द होईपर्यंत सील बंदची कार्यवाही होईल.

(Wedding organizers will have to follow government guidelines in Nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT