Sunandan Lele esakal
नाशिक

सह्याद्री संवाद - ‘क्रिकेटने मला काय शिकविले?‘

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘सह्याद्री फार्म्स’च्या (Sahyadri Farms) सह्याद्री संवाद या उपक्रमांतर्गत प्रसिध्द क्रिडा समीक्षक सुनंदन लेले (Sports critic Sunandan Lele) यांचे ‘क्रिकेटने मला काय शिकविले?‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.  आपल्या वैयक्तिक वा व्यावसायीक जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रिकेटकडे कसे पहावे, क्रिकेटकडून (Cricket) काय शिकावे यावर ते या कार्यक्रमात दृकश्राव्य (Audiovisual) तंत्राचा आधार घेत संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी ५:३० वाजता सह्याद्री फार्म्सच्या मोहाडी (ता.दिंडोरी) येथील प्रांगणात हा  कार्यक्रम होईल.

सुनंदन लेले हे मागील ३० वर्षांपासून क्रिडा पत्रकारितेत आहेत. त्यांनी २०० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचे तर ३०० पेक्षा जास्त एक दिवसीय सामन्यांचे वार्तांकन केले आहे. तसेच वर्ल्ड कप (ODI World Cup) व टी-20 वर्ल्डकपचेही (T20 World cup) वार्तांकन त्यांनी केले आहे.त्या आधी त्यांनी महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघाचे कप्तानपदही भूषविले आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून क्रिकेटप्रेमी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सह्याद्री फार्म्स’तर्फे करण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Light Bill Update: बापरे... ऑगस्टचं वीज बिल वाढणार! महावितरणचा घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही झटका; किती वाढणार बिल?

Sports Governance: भारतीय टेबल टेनिस महासंघ निलंबित; प्रशासनात मोठ्या त्रुटी असल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालयाची कारवाई

Latest Marathi News Live Update : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Mumbai News: विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! इमारतीला आग; चिमुरड्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT