neem.jpg 
नाशिक

अचानक झालंय काय 'इथल्या' कडुलिंबाच्या झाडांना? शेतकरीही अचंबित..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / देवळा : परिसरात अज्ञात रोगाने कडुलिंबाच्या झाडांची पाने वाळू लागल्याने शेतकरी वर्गात व नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. कीटकनाशक असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडांची अशी स्थिती निर्माण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

वनस्पतिशास्त्रज्ञांसाठी हा विषय आता आव्हानाचा

शेतातील पिकांवर जर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला तर शेतकरी लिंबाच्या पाल्याचा, तसेच निंबोळी अर्क यांची त्यावर फवारणी करतात. पण आता त्यावरच रोगाचे आक्रमण म्हणजे आश्‍चर्यच असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे कोरोनाने मानवी जीवनचक्र बिघडवून टाकले असताना लिंबाच्या झाडांची पाने वाळू लागल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. शेतकऱ्यांनी या रोगाला "वाळोना' असे नाव दिले आहे. ही झाडे का वाळत आहेत याबाबत संशोधन होऊन उपाययोजना सुचविल्या जाव्यात, अशी मागणी होत आहे. 

शेतकऱ्यांकडून अनभिज्ञता
कसमादे पट्ट्यात व येथील परिसरात कडुलिंबाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत; परंतु गेल्या दीड-दोन महिन्यांपासून या झाडांची पाने वाळू लागली आहेत. काही पाने हिरवी, काही सुकत आहेत, तर काही पूर्ण वाळली आहेत. याबाबत शेतकऱ्यांना विचारले असता त्यांनी अनभिज्ञता दाखविली. खोडकिडा असल्याचा अंदाज घेतला असता तसेही काही दिसून आले नाही. 

लिंबाची झाडे अर्धवट वाळली

रस्त्याच्या कडेला तसेच शेताच्या बांधावर असणाऱ्या बहुतांश लिंबाची झाडे अर्धवट वाळली आहेत. खोडाचे जवळून निरीक्षण केले असता खोडकिडा दिसून आला नाही. वाळलेल्या पानांवर मात्र काळपट बुरशीजन्य भाग आढळून आला आहे. यामागचे निश्‍चित कारण शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे. -प्रा. रवींद्र शिरसाठ, वनस्पतिशास्त्र विभाग, कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय, देवळा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT