राज ठाकरे Sakal
नाशिक

महामार्गावर गतिरोधकांची काय गरज? - राज ठाकरे

रस्त्यांच्या अधोगतीवर राज ठाकरे यांच्याकडून नाराजी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महामार्गावरील खड्ड्यांमुळे खडतर प्रवासाला सामोरे जावे लागले. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने धावत असताना त्यात अनेक ठिकाणी गतिरोधक आल्याने राज ठाकरे यांनी टीकात्मक स्वरात महामार्गावर गतिरोधकांची काय गरज, असा सवाल करीत रस्त्यांच्या अधोगतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नेते अमित ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. बुधवारी (ता.२१) दुपारी राज यांचे हॉटेल एसएसके येथे आगमन झाले. या वेळी ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हा प्रमुख दिलीप दातीर, अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलीम शेख आदींनी स्वागत केले. पहिल्या दिवशी राज ठाकरे यांनी १२२ शाखाध्यक्षांच्या यादीवर मोहोर उमटविली. दुपारी अमित ठाकरे यांनी नियुक्त्‍या जाहीर केल्या. गुरुवारी (ता. २३) विधानसभा अध्यक्ष व नव्याने नियुक्त १२२ शाखाध्यक्षांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

नाशिकमध्ये पोचण्यास विलंब

मुंबईहून नाशिककडे वाहनाने प्रवास करताना मुंबई- आग्रा महामार्गावर खड्ड्यांमुळे खडतर प्रवासाला सामोरे जावे लागले. इगतपुरी ते कसारा घाट, गोंदे, वाडीवऱ्हे, खर्डी, शहापूर या ठिकाणी महामार्गावर मोठे खड्ड्यांमुळे राज ठाकरे यांना नाशिकमध्ये पोचण्यास विलंब झाला. खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावली होती. त्यात ठिकठिकाणी गतिरोधक असल्याने त्याची आवश्‍यकता काय, असा सवाल राज ठाकरे यांनी करीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

शाखाध्यक्ष होणार मनसेचे राजदूत

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेने संघटना मजबुतीवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या धर्तीवर मनसेने शाखाध्यक्ष नियुक्त केले असून, ते राजदूत म्हणून काम पाहणार आहे. शाखाध्यक्षांच्या मार्फत मनसेची सत्ता असताना केलेली कामे, सामाजिक दायित्वाच्या निधीतून झालेले प्रकल्प तसेच सत्ताधारी भाजपच्या काळात प्रकल्पांची झालेली वाताहात आदींबाबत माहिती लोकांपर्यंत पोचविण्याचे काम शाखाध्यक्षांच्या मार्फत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT