2000 Rupee Note esakal
नाशिक

2000 Rupee Note : 2 हजारांच्या नोटा नेमक्या गेल्या तरी कुठं?

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : नोटाबंदीनंतर जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बाद ठरवित दोन हजारांची नवी नोट चलनात आणली. सुरवातीला दोन हजारांच्या नोटेशिवाय दुसरी नोट दिसत नव्हती. आता मात्र एक वर्षापासून बँक, एटीएममध्येही दोन हजारांच्या नोटांचे दर्शन होत नसल्याने या नोटा गेल्या तरी कुठे, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. (Where exactly are 2 thousand rupees notes nowadays nashik news)

दोन हजारांची नोट चलनात आल्यानंतर या नोटासुध्दा चलनात मोठ्या प्रमाणात दिसुन येत होत्या.मात्र,गत बारा महिन्यापासुन ग्रामीण भागात दैनंदिन व्यवहारात दोन हजारांच्या नोटा गायब झाल्या आहेत.त्यामुळे आर्थिक व्यवसाह करतांना अनेक अडचणी येत आहेत.बॅकेच्या दैनदिन व्यवहारातसुध्दा ग्राहकांना 500,200,100,50 रूपयांच्या नोटा दिल्या जात आहेत.

दोन हजारांची नोट बाजारात दिसत नसल्यामुळे व्यापारी वर्गालाही दोन हजारांची नोट व्यवहारात येत नसल्याने व्यवहार करतांना अडचणी येत आहेत.पिंपळगांव बसवंत हे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधीक उलाढाल होणारी बाजारपेठ आहे.शहरात मोठ्या प्रमाणात रोकड व्यवहार होत असल्याने छोट्या नोटामुळे त्या हाताळणे व्यवसायीकांना मुश्‍कील होत आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा बाजार थांबविण्याच्या उद्देशाने नोटबंदी घोषीत केली होती.त्यानंतर दोन हजाराची नोट चलनात आली होती.मात्र,आता ही नोट गायब झाल्यामुळे सदरील नोटा गेल्या तरी कुठे असे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे.चलनातुन गायब झालेल्या या नोटा एटीएममधुन ही दिसेनाशा झाल्याने याबाबत ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले आहे.

नोटांचा स्टॉक तर नाही ना...काळापैसा देशात परत आणण्यासाठी नोटबंदी करण्यात आली होती.सुरूवातीच्या काळात दोन हजारांच्या नोटांची चलती होती.मात्र,नव्या पाचशे,शंभर रूपयांच्या नोटा चलनात आल्या आणि दोन हजारांच्या नोटांचे स्टॉक करणे सुरू केले.काळाबाजार करणार्यांनी या नोटाचां स्टॉक करून ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT