farmer was worried2.jpg 
नाशिक

#Lockdown : 'लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विकायचा कुठं?'...म्हणून 'ते' साडेचार एकरवरील शेतमाल थेट जनावरांना खाऊ घालताय...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिमपट्ट्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात द्राक्ष, भाजीपाला मोठ्या प्रमाणात शेतात निघत असतो. यंदाही हवामान अनुकूल असल्याने तसेच पाऊस भरपूर पडल्याने धरणे, विहिरी, बोअरवेलला भरपूर पाणी असल्याने उन्हाळी बागायती पिके जोमात आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे द्राक्षशेतीबरोबर भाजीपाला विकायचा कुठं? ग्राहक नाही, व्यापारी माल घेत नाही, परप्रांतातील व्यापारी आपल्या प्रांतात निघून गेलेत. बाजार समितीत मातीमोल बाजारभाव असल्याने नाशवंत द्राक्ष व भाजीपाला विकायचा कसा? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

शेतकरी कमालीच्या निराशेत, चिंतेत सापडला

अशा स्थितीत काल दुगाव येथील मनोहर थेटे या तरुण शेतकऱ्याने उभ्या पीक आलेल्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली. काही शेतकऱ्यांनी फुक्कट भाजीपाला, धान्य वाटले, असाच प्रकार नाशिक तालुक्यातील नागलवाडीच्या दक्षिणेस असलेल्या सागर भोर, राहुल भोर यांच्या शेतात "हेचि देही हेचि डोळा" बघायला मिळाला. या दोन भावंडांनी थेट शेतातील ताजे हिरवेगार गिलके, लाखोंचे खर्च करून उभारलेल्या शेडनेट मधील शिमला मिरचीचे खुडलेले पीक कैरेटमध्ये भरून थेट गावात मोफत दिले. तर काही शेतातील जनावरांना खायला दिले. 

शेतकरी कमालीच्या निराशेत, चिंतेत

रोज 45 कैरेट गिलके जनावरांना घालण्याशिवाय पर्याय नाही, लोकही ते फार घेत नाही. लॉकडाऊनमूळे शेतमजूर शेतातील कामास मिळत नाही, द्राक्ष भाजीपाला मातीमोल विकला जात आहे. लोक बाहेर बाजारात येत नसल्याने शेतमाल घेणार कोण? यामुळं शेतमालाची मागणीही रोडावली आहे. त्यात बाजारभाव कवडीमोल असल्याने शेतकरी कमालीच्या निराशेत, चिंतेत सापडला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

लाखो रुपये उत्पादन खर्च करून लावलेल्या लोखंडी अँगल फिटिंगच्या गिळक्याच्या शेतीला यंदा भरपूर गिलके लागलेले आहे. तसेच आम्ही मोठया कष्टाने शेडनेटमध्ये शिमला लावली आहे, तिचे ही उत्पादन सुरू झाले असून ही पिके रोज खुडावीच लागतात. अन्यथा माल सडतो, खराब होतो, त्यामुळेच मजूर मिळत नसतांनाही शेतातील गिलके, शिमला खुडावीच लागतात. मात्र हातात दमडीही पडत नसल्याने मोठे दुःख होत आहे. आजच्या स्थितीत शेतीमाल विक्रीचे नियोजन असमाधानकारक असल्याने आज शेतकरी लॉकडाऊनच्या भीतीत, मातीमोल बाजार असल्यानं पुरता भरडला आहे. - सागर वसंत भोर, शेतकरी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT