crop loan.jpg
crop loan.jpg 
नाशिक

पीककर्ज फक्त नावालाच! का चालवलीय शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?

मुकुंद पिंगळे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खरिपाच्या हंगामात भांडवल उभे करताना शेतकरी मोठ्या अडचणीतून जात आहे. अनेक शेतकऱ्यांना बँका प्रतिसाद देत नसल्याने खरीप हंगामासाठी सावकारी अन् खासगी कर्जाची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे हंगाम संपल्यावर पीककर्ज देणार का? अशी संतप्त भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

७२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित 

खरिपाच्या हंगामात भांडवल उभे करताना शेतकरी मोठ्या अडचणीतून जात आहे. त्यामुळे बँकांकडे पीककर्ज एवढा एकमेव पर्याय शेतकऱ्याकडे आहे. मात्र एकीकडे सरकार म्हणते कर्ज द्या अन् दुसरीकडे बँका उभ्या करत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ७२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. अडचणीच्या कोंडीत सापडलेला शेतकरी विनवण्या करत असताना बँकांसाठी सरकारी आदेश व सूचना नावपुरत्या उरल्याची स्थिती आहे. एकामागून एक संकटे झेलूनही शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून खरीप हंगामाला सामोरे जात आहे. मात्र, शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र जिल्हाभर आहे. 

शेतकरी म्हणतात, मंत्र्याचा वचक आहे की नाही!
 
नाशिकसारख्या कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी खरीप हंगाम आढावा बैठक ते आजपर्यंत खरीप कर्जाला गती मिळावी, अशा बँक प्रशासनाला सूचना केल्या, तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पीककर्ज वितरणात गती यावी, यासाठी प्रत्येक बुधवारी आढावा घेतला जाईल, असे जाहीर केले. मात्र, असे होऊनही त्यास गती नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मंत्र्यांचा व प्रशासनाचा वचक उरला नाही, अशी परिस्थिती असल्याने बँका मनमानी करतात, अशी ओरड शेतकरी करत आहेत. 

बँका...लक्ष्यांक (कोटी रुपये)… वितरण(कोटी)...खाती 

राष्ट्रीयीकृत बँका...२२४३.७९...६६३.२५...१७५२८ 
खासगी बँका...६०६.७४...१३३.४६...३८२६ 
ग्रामीण बँका....१६.८७...१.८४...१०८ 
जिल्हा सहकारी बँक...४३७.३७...१२६.५०...६६०६ 
एकूण...३३०३.७६...९२५.०६...२८१३८ 

कर्जमाफी फक्त नावापुरती झाली आहे. बँकवाल्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. आता बँकेचे प्रतिनिधी सर्च रिपोर्ट आणा, सर्व नोंदी काढा, सर्व सातबारा उतारे आणा, या अनेक समस्यांनी शेतकरी चिंतेत आहे. कोरोनाचे कारण देत वेळ मारून नेली जात आहे. मग कर्ज हंगाम संपल्यावर मिळणार आहे का? - देवेंद्र काजळे, शेतकरी, कारसूळ (ता. निफाड) 

पीककर्जाचे वाटप हितसंबंध जपून केले जात आहे. बँकेचे प्रशासन उडवाउडवीची उत्तरे मिळतात. विनवण्या करूनही वेळवर पैसे मिळत नसल्याने सावकाराशिवाय पर्याय उरलेला नाही. - अनिल कोठुळे, शेतकरी, पिंपळणारे (ता. चांदवड) 

बँकांचा आढावा घेऊन कामकाज सुरू आहे. त्यानुसार आदेश देण्यात येत आहे. जुलैअखेर कामकाजास गती येईल. - गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT