नाशिक : (नामपूर) ‘निसर्गाने तारले; पण व्यवस्थेने मारले’, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. नामपूर शहरात गेल्या आठ दिवसांपासून दुकानांमध्ये यूरियाच शिल्लक नाही. एक गोणी मिळावी, यासाठी शेतकरी दुकानदारांच्या विनवण्या करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतातील पिके जळाल्यानंतर युरिया देणार का? असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मुबलक खताच्या मागणीचे निवेदन
यूरियाच्या टंचाईबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही सोयरेसुतक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून विक्रेत्यांना मागणीच्या तुलनेत अत्यल्प खतपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात खतटंचाई जाणवत आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी याकामी लक्ष घालून विक्रेत्यांना मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावे, अशा मागणी निवेदनाद्वारा नामपूर सहकारी सोसायटीचे सभापती रूपेश सावंत, उपसभापती माधवराव सावंत, सरपंच अशोक पवार, युवानेते डॉ. दिकपाल गिरासे यांनी केली आहे.
अक्षरशः तारेवरची कसरतच
नामपूर शहरात रासायनिक खतांचा पुरवठा नामपूर बुहत सहकारी सोसायटी व वैभव ॲग्रो एजन्सीज यांच्या मार्फत केला जातो. मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील ३५ ते ४० खेड्यांमधील शेतकरी खते व कृषी साहित्य खरेदीसाठी नामपूरला प्रथम पसंती देतात. विशेष बाब म्हणजे, दोन्ही ठिकाणी शासकीय दराने खतविक्री होत असल्याने शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नसते. परंतु गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमुळे कंपन्यांकडे पुरेसा माल उपलब्ध नसल्याने स्थानिक पातळीवर विक्रेत्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी यांनी शहरासाठी तातडीने एक हजार टन यूरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार
शेतकऱ्यांकडून यूरियाचा शोध
यंदा नामपूरसह मोसम खोऱ्यात पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मका, बाजरी, तूर, कापूस, कांदा, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली आहे. पिकांच्या पोषक वाढीसाठी, तसेच अतिरिक्त पावसामुळे पिके पिवळी पडत असल्याने खताची मात्रा देणे गरजेचे असताना पुरेशा प्रमाणात खते मिळत नसल्याने खतविक्री करणाऱ्या दुकानांमध्ये शेतकरी यूरियाचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.