Winter session esakal
नाशिक

Winter Temperature in Nashik : नाशिककरांना भरली हुडहुडी; किमान तापमान 13.6

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा वाढला असून, नाशिककरांना सायंकाळच्‍या वेळी हुडहुडी भरते आहे. तापमानात घट झालेली असून, शनिवारी (ता.२९) नाशिकचे किमान तापमान १३.६ अंश सेल्‍सीयस नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानातही घट होत तीस अंशांपेक्षा कमी होत २९ अंश सेल्‍सीयसची नोंद झालेली आहे. (Winter Temperature in Nashik Minimum temperature 14 degree nashik news)

परतीच्‍या पावसाने जोरदार हजेरी लावल्‍याने नागरिकांची तारांबळ उडालेली होती. परंतु गेल्‍या आठवड्याभरापासून वातावरणात बदल झालेले असून, गारवा वाढल्‍याची अनुभूती येते आहे. दिवसाच्‍या वेळी कडक उन तर सायंकाळनंतर मात्र वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. यंदाच्‍या हंगामातील निच्चांकी किमान तापमानाची चार दिवसांपूर्वी २५ ऑक्‍टोबरला नोंद झालेली आहे. या दिवशी किमान तापमान १३.४ अंश सेल्‍सीयस नोंदविले गेले होते.

यानंतर सातत्‍याने तापमान कमी राहिले आहे. त्‍यातच शनिवारी (ता.२९) नाशिकचे किमान तापमान १३.६ अंश सेल्‍सीयस नोंदविले आहे. तर कमाल तापमान २९ अंश सेल्‍सीयस नोंदविले आहे. काल (ता.२८) किमान तापमान १५.३ अंश सेल्‍सीयस तर कमाल तापमान २९.८ अंश सेल्‍सीयस नोंदविले आहे. २७ ऑक्‍टोबरला १४ अंशाचे किमान तर २९.७ अंश सेल्‍सीयस इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे.

दिवसा कडक उन्‍हाचा अनुभव

सायंकाळनंतर गारवा जाणवत असला तरी दिवसाच्‍या वेळी मात्र तप्त सूर्यकिरणांमुळे कडक उन्‍हाचा अनुभव नागरिकांना येतो आहे. विशेषतः दुपारी बारा ते दोन या वेळेत तप्त उन्‍हामुळे जनजीवन प्रभावित होत असल्‍याचे बघायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

ODI World Cup मधूनच बाहेर होण्याची वेस्ट इंडिजवर पुन्हा टांगती तलवार, थेट एन्ट्री हुकली! काय आहे यामागचं गणित?

‘पँट वर करता येत नाही का?’ अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Viral Video

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT