Nashik: हाताच्या बोटांचे यशस्वीरीत्या पुनर्रोपण; गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया पूर्ण

Renowned plastic and cosmetic surgeon Dr. Manoj Bachhav along with Roshan Sonwane and his family after successfully completing the very complicated and difficult surgery on the finger and replanting the finger.
Renowned plastic and cosmetic surgeon Dr. Manoj Bachhav along with Roshan Sonwane and his family after successfully completing the very complicated and difficult surgery on the finger and replanting the finger.esakal

सटाणा : एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे घरी ऊस कापण्याच्या नादात सटाणा शहरातील तरुणाच्या डाव्या हाताचे पहिले बोट चुकून कोयत्याने पूर्णपणे कापले गेल्याने मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. बोट फक्त त्वचेला लटकून असल्याच्या अवस्थेत होते. मात्र तालुक्याचे भूमिपुत्र व प्रख्यात प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन डॉ.मनोज विलास बच्छाव यांनी अत्यंत गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करीत बोटाचे पुनर्रोपण केल्याने या तरुणाला पुन्हा हाताच्या बोटाचा आधार मिळाला आहे.

लक्ष्मीपूजनाचा भाऊबीज आल्याने सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू होती. याचवेळी शहरातील पिंपळेश्वर रोडवरील रोशन विजय सोनवणे हा घरी ऊस कापत असताना चुकून कोयत्याने त्याच्या डाव्या हाताचे बोट कापले गेले आणि मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. बोट फक्त त्वचेला लटकून होते. यावेळी सोनवणे कुटुंबियांनी तत्काळ डॉ.सागर शेवाळे यांना कळविले. त्यांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील दोन तासाच्या आत बोटावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून या अवघड शस्त्रक्रियेसाठी प्लास्टिक सर्जनची आवश्यकता असल्याचे सांगितले.(Finger Replantation Surgery Successfully completed Nashik News)

Renowned plastic and cosmetic surgeon Dr. Manoj Bachhav along with Roshan Sonwane and his family after successfully completing the very complicated and difficult surgery on the finger and replanting the finger.
Jalgaon : अमळनेरात चोरट्यांची दिवाळी; दागिन्यांसह रोकड लंपास

मात्र दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने नाशिकला प्लास्टिक सर्जन उपलब्ध होणे अशक्य वाटत होते. त्यामुळे डॉ.शेवाळे यांनी तत्काळ तालुक्याचे भूमिपुत्र व प्रख्यात प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन डॉ.मनोज बच्छाव यांच्याशी संपर्क साधला. योगायोगाने डॉ.बच्छाव दिवाळीच्या सुट्टीसाठी सटाणा येथे आपल्या घरी आले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रोशनच्या बोटांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली आणि त्याला सिम्स रुग्णालयात दाखल करून घेतले.

दिवाळीमुळे रुग्णालयातील अर्ध्याहून अधिक कर्मचारी सुट्टीवर होते. डॉ.बच्छाव यांनी रोशनच्या सर्व नातेवाईकांना शस्त्रक्रियेची कल्पना देताना हातातील रक्तवाहिन्या अत्यंत बारीक व नाजूक असल्याने त्यांना जोडण्यासाठी अवघड शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. नातेवाईकांनी त्यांच्या उपचारांवर पूर्ण विश्वास दाखवत शस्त्रक्रियेसाठी तत्काळ संमती दिली. यानंतर शस्त्रक्रियेद्वारे बोट वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला. ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची व कठीण होती.

Renowned plastic and cosmetic surgeon Dr. Manoj Bachhav along with Roshan Sonwane and his family after successfully completing the very complicated and difficult surgery on the finger and replanting the finger.
Jalgaon : यज्ञेशच्या उपचाराचा मार्ग मोकळा; पालकमंत्र्यांचा मदतीचा हात

अगदी तारुण्यातच हाताचे पहिले बोट पूर्णपणे कापले गेल्याने ते पूर्ववत होईल की नाही या चिंतेत नातेवाईकांच्या चेहर्‍यावर मोठा तणाव होता. तीन तासांची गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया झाल्यानंतर बोटाचे पुनर्रोपण करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात डॉ.बच्छाव यांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर आज चार दिवसानंतर रोशनचे बोट पूर्ववत झाले आहे. त्याला पुढील दोन दिवसात डिस्चार्ज मिळेल. यानंतर तंतू पूर्णपणे जोडण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जाईल. चार आठवड्यानंतर इन हाड जोडण्यासाठी टाकलेली के वायर काढून टाकली जाईल व त्यानंतर बोटाची हालचाल वाढवण्यासाठी फिजिओथेरपी करावी लागेल. याकामी डॉ.बच्छाव यांना सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ.संदेश निकम, डॉ.तुषार वाघ, डॉ.हरितसिंग कथुरिया व डॉ.सागर शेवाळे यांचे सहकार्य लाभले.

याबाबत बोलताना सर्जन डॉ.मनोज बच्छाव म्हणाले, हाताचे बोट तुटून रक्तपुरवठा खंडित झाला असेल तर तो काही तासातच सुरळीत करणे गरजेचे असते. बोटांच्या रक्तवाहिन्या अत्यंत सूक्ष्म असल्याने त्या जोडणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. ते सुरळीत केल्यानंतरही त्यामधून अखंडित रक्तपुरवठा सुरळीत राहणे महत्त्वाचे असते. अन्यथा बोट काळा पडण्याची किंवा तो काढून टाकावा लागतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर पुढील ७२ तास जिकरीचे असतात. बोटाचे इतर तंतू व हाड जुळवणी देखील त्याच शस्त्रक्रियेमध्ये केली जाते.

त्यासाठी बोट पूर्णपणे बरा होण्यासाठी काही कालावधी जातो. पण रक्तपुरवठा सुरळीत राहून बोट जगला तरच या गोष्टी पुढे करता येऊ शकतात. रोशन सोनवणे याची शस्त्रक्रिया होऊन आता ७२ तासांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे आणि बोट पूर्णपणे वाचला आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी असल्याने ही शस्त्रक्रिया सटाण्यातच सिम्स हॉस्पिटलमध्ये करता आली आणि एका तरुणाचा बोट वाचवू शकलो, याचा नक्कीच आनंद असून दिवाळी खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे समाधान आहे.

Renowned plastic and cosmetic surgeon Dr. Manoj Bachhav along with Roshan Sonwane and his family after successfully completing the very complicated and difficult surgery on the finger and replanting the finger.
Bhaubeej Special : राजकीय मतभेद,त्यापलिकडे नाते अभेद्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com