Winter sakal
नाशिक

Nashik Winter Update: पाऱ्यात 3.9 अंशांची वाढ; ढगाळ वातावरणाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update: पाऱ्याची चढ-उतार सातत्‍याने सुरू असून, यामुळे नाशिककर चक्रावल्‍याची स्‍थिती आहे. कधी वातावरणात गार वाऱ्याची अनुभूती येत असताना कधी गारवा गायब होत असल्‍याची अनुभूती सध्या नाशिककरांना येते आहे. (Winter Update minimum temperature was recorded at 189 degrees Celsius nashik news)

गुरुवारी (ता.२३) नाशिकचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस असताना एका दिवसात पाऱ्यात ३.९ अंशांनी वाढ होऊन शुक्रवारी (ता. २४) किमान तामपान १८.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसभर राहिलेल्‍या ढगाळ वातावरणामुळे पाऱ्यात वाढ झाली आहे.

हवामान खात्‍याने वर्तविलेल्‍या अंदाजानुसार शुक्रवारी दिवसभर आकाश ढगांनी व्‍यापले होते. काही वेळे ऊन पडत असले तरी दिवसभरातील बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहिले. यामुळे मात्र वातावरणातील थंडी पूर्णपणे गायब झाल्‍याची अनुभूती नाशिककरांनी घेतली. गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातील बदल नाशिककरांना कोड्यात टाकणारे ठरत आहेत.

शनिवारी (ता. १८) नाशिकचे किमान तापमान घटून १४.२ अंश सेल्सिअसवर पोचले होते. मात्र त्‍यानंतर पुन्‍हा सातत्‍याने वाढ होताना किमान तापमान १७ अंशांवर पोचले. पुन्‍हा थंडीत वाढ होऊन बुधवारी (ता. २२) किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस राहिले.

गुरुवारी पाऱ्यात वाढ होऊन १५ अंश सेल्सिअसवर राहिलेले किमान तापमान शुक्रवारी १८.९ अंश सेल्सिअस राहिले. एकीकडे किमान तापमान वाढत असताना दुसरीकडे कमाल तापमानात मात्र घट झाली आहे. बऱ्याच दिवसांनंतर नाशिकचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसखाली पोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT