Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : आर्थिक फसवणूक करून महिलेला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आर्थिक व्यवहारातून दुचाकीस्वार तरुणीस भररस्त्यात बेदम मारहाण करीत एकाने विनयभंग केल्याचा प्रकार वडाळा नाका परिसरात उघडकीस आला. पैशांची मागणी केल्याने संतप्त संशयिताने हे कृत्य केले असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Woman beaten by financial fraud Nashik Crime News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

अजहर रशीद खान (रा.वडाळा नाका, द्वारका) असे संशयिताचे नाव आहे. तरुणी व संशयित एकमेकांचे परिचित असून, त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. बुधवारी (ता. १८) रात्री युवती खोडेनगर भागात दुचाकीवरून जात असताना तिला अजहर खान दिसला.

त्यामुळे तिने गाडी रस्त्यावर थांबवून त्याच्याकडे हात उसनवार दिलेल्या पैशांची मागणी केली. भररस्त्यात पैशांची मागणी केल्याने संतप्त अजहर खाने याने तरुणीस शिवीगाळ व मारहाण करीत विनयभंग केला. अचानक संशयिताने हल्ला चढविल्याने भेदरलेल्या तरुणीने आरडाओरड केली असता संशयिताने पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT